शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या धडकेत जखमी झाल्याने बारावीचा विद्यार्थी परीक्षेस मुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 13:38 IST

गंभीर जखमी झाल्याने पहिल्या दिवसापासूनच तो परीक्षेस मुकला आहे.

ठळक मुद्दे घटना गुरुवारी सकाळी १० वा.च्या सुमारास तीनहातनाका येथे घडली. मुंबई-नाशिक पूर्व द्रुतगती मार्गावर तीनहातनाका येथे सुरेश हा पायी सिग्नल क्रॉस करत असताना भरधाव वेगाने आलेल्या पुजारी याच्या बसने त्याला उडवले.छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता तो धोक्याबाहेर आहे.

ठाणे - एका टेम्पो ट्रॅव्हलर बसच्या धडकेमध्ये बारावी परीक्षेचा इंग्रजीचा पेपर द्यायला निघालेला रोहित चंदनशिवे (१९, रा. संजय गांधीनगर, नवी मुंबई) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वा.च्या सुमारास तीनहातनाका येथे घडली. याप्रकरणी बसचालक संदीलकुमार पुजारी (३६, रा. गोरेगाव, मुंबई) याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. गंभीर जखमी झाल्याने पहिल्या दिवसापासूनच तो परीक्षेस मुकला आहे.मुंबई-नाशिक पूर्व द्रुतगती मार्गावर तीनहातनाका येथे सुरेश हा पायी सिग्नल क्रॉस करत असताना भरधाव वेगाने आलेल्या पुजारी याच्या बसने त्याला उडवले. यात त्याच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी त्याला नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता तो धोक्याबाहेर आहे. मात्र, मानसिक धक्का बसल्याने तो पुढील पेपर देऊ शकेल की नाही, हे सांगता येणार नसल्याचे त्याच्यावर उपचार करणारे शेखर सुराडकर यांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थीPoliceपोलिसthaneठाणे