मद्यपी मुलाला आईचे बोलणे सहन नाही झाले, घराच्या छतावर नेऊन जन्मदात्रीसोबत असे काही केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 16:48 IST2021-09-20T16:47:24+5:302021-09-20T16:48:24+5:30
Crime News: राजस्थानमधील भरतपूर शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका मद्यपी मुलाने नशेमध्ये आईला घराच्या छतावर नेऊन तिला धक्का दिला.

मद्यपी मुलाला आईचे बोलणे सहन नाही झाले, घराच्या छतावर नेऊन जन्मदात्रीसोबत असे काही केले
जयपूर - राजस्थानमधील भरतपूर शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका मद्यपी मुलाने नशेमध्ये आईला घराच्या छतावर नेऊन तिला धक्का दिला. त्यामुळे घटनास्थळीच या महिलेचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी मुलगा फरार झाला आहे. आता पोलिसांकडून आरोपी मुलाचा शोध घेतला जात आहे. (drunken son murder his Mother in Rajasthan )
ही घटना भरतपूर शहरातील वॉर्ड क्रमांक ४० मध्ये घडली आहे. पोलिसांनी मृतदेह तिथून उचलून स्थानिक रुग्णालयातील शवागारात ठेवला आहे. आता पोलीस आरोपी मुलाचा शोध घेत आहेत. मात्र त्याच्याबाबत अद्याप कुठलाही सुगावा मिळू शकलेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील के.बी. नारायण गेट येथील गुरुद्वाराजवळ राहणारा शेरू नावाचा तरुण मद्यपी आहे. तो मद्यपान करून घरामध्ये नेहमी भांडण करत असे. मद्याच्या व्यसनामुळे त्याची आई हुकमी बाई त्याला सतत बोलत असे. त्यामुळे आई आणि मुलामध्ये नेहमी भांडण होत असे. मात्र रविवारी रात्री भांडणादरम्यान त्याने सर्व मर्यादा पार केल्या. रात्री सुमारे १० वाजता शेरूने दारूच्या नशेमध्ये आईसोबत भांडण केले. आईला घऱाच्या छतावर नेऊन तिला खाली ढकलून दिले. यामध्ये आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती समजताच आसपासचे लोक तिथे गोळा झाले. तेव्हा परिस्थिती पाहून शेरू तिथून पसार झाला. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.