कल्याणमध्ये भर बाजारपेठेत टोईंग व्हॅनचा थरार; 9 दुचाकी, एक कार उडवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 15:57 IST2020-01-30T15:04:56+5:302020-01-30T15:57:38+5:30
टेम्पोच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कल्याण स्टेशन रोडवर थरार घडला.

कल्याणमध्ये भर बाजारपेठेत टोईंग व्हॅनचा थरार; 9 दुचाकी, एक कार उडवली
कल्याण : अनधिकृतरित्या पार्क केलेल्या वाहनांना टो करून नेणाऱ्या टेम्पोच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने कल्याण स्टेशन रोडवर थरार घडला.
अनियंत्रित झालेल्या टोईंग व्हॅनने एकाचवेळी पार्क केलेल्या 9 दुचाकी आणि एका कारला उडविले. यामुळे दुचाकी आणि कारचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर हे वाहन सोनाराच्या दुकानात घुसणार होते. मात्र, पायरीला टायर अडल्याने थांबले अन्यथा मोठा अपघात घडला असता.
टेम्पो चालकाला नागरिकांनी जाब विचारला. अद्याप जखमींबाबत काही माहिती समजलेली नाही. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....