पिंपळे निलख येथे भाड्याने दिलेल्या मोटारसह चालक फरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 19:55 IST2019-07-30T19:54:25+5:302019-07-30T19:55:48+5:30

मोटार मालकाकडून मोटार चालवण्यासाठी घेत त्याबदल्यात महिन्याला ठराविक रक्कम देण्याचे ठरले

The driver disappear with a car who given on rent rental in the Pimple Nilakh | पिंपळे निलख येथे भाड्याने दिलेल्या मोटारसह चालक फरार 

पिंपळे निलख येथे भाड्याने दिलेल्या मोटारसह चालक फरार 

पिंपरी : मोटार मालकाकडून मोटार चालवण्यासाठी घेतली. त्याबदल्यात महिन्याला ठराविक रक्कम देण्याचे ठरले. मात्र, चालकाने तीन महिने भाडे दिले नाही. तीन महिन्यांनंतर चालक मोटारीसह फरार झाला. ही घटना २४ एप्रिल ते २९ जुलै या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली.
   अमित पुरुषोत्तम काळेकर (वय ३५, रा. पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिषेक ज्ञानेश्वर काकडे (वय २९, रा. बोरीवली पूर्व, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित यांच्या मालकीची (एम एच ०३/ बी़ सी़ ४८६२) ही मोटार आहे. ती मोटार त्यांनी अभिषेक याला चालवण्यासाठी भाड्याने दिली होती. त्याबदल्यात महिन्याला ठराविक रक्कम देण्याचे ठरले होते. २४ एप्रिल रोजी अभिषेक याने अमित यांच्याकडून मोटार नेली. त्याने तीन महिने ठरल्याप्रमाणे भाडे दिले नाही. त्यानंतर अभिषेक मोटार घेऊन गायब झाला.
 

Web Title: The driver disappear with a car who given on rent rental in the Pimple Nilakh