Double murder happen in uttar pradesh, two with mother - father arrested by police pda | लाठी - काठीने बेदम मारहाण करून केली दोघांची हत्या, तरुणीच्या आई - वडिलांसह दोघांना बेड्या 

लाठी - काठीने बेदम मारहाण करून केली दोघांची हत्या, तरुणीच्या आई - वडिलांसह दोघांना बेड्या 

ठळक मुद्देघटनास्थळी पोहोचून पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींमध्ये मुलीचे आई - वडील आणि नातेवाईकांचा समावेश आहे.

एका युवतीचे शेजारच्या विवाहित पुरुषाशी प्रेमसंबंध होते. एका रात्री तो पुरुष त्या युवतीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोचला तेव्हा तिच्या घरातल्यांनी प्रथम युवतीची हत्या केली. नंतर लाठी - काठ्याने पुरुषाला मारहाण करून हत्या केली. ही डबल मर्डरची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील राजधानी असलेल्या लखनऊ येथे घडली आहे.


लखनऊ येथे या घटनेनंतर खळबळ माजली. युवतीला भेटायला आलेल्या विवाहित पुरुषाची मुलीच्या कुटुंबियांनी प्रथम आपल्या मुलीची हत्या केली आणि नंतर विवाहित पुरुषास लाठी - काठीने मारहाण करून त्याची हत्या केली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. चार आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे. या आरोपींमध्ये मुलीचे आई - वडील आणि नातेवाईकांचा समावेश आहे. पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहेत.


लखनऊ येथील सहादतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मन्सूर नगरमध्ये सुफीया नावाची युवती आपल्या कुटुंबासह राहत होती. या तरुणीचे शेजारी राहणाऱ्या अब्दूलशी प्रेमसंबंध होते. शनिवारी उशिरा रात्री अब्दुल तरुणीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला, त्यावेळी तेथे विवाद निर्माण झाला, त्यानंतर युवतीच्या घरातील मंडळींनी दोघांनाही लाठी - काठीने मारहाण सुरू केली. या जबर मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि मारहाण करणाऱ्या कुटुंबातील चार जणांना अटक केली. दरम्यान मृत पुरुषाच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, युवकास मारहाण करणाऱ्या लोकांनी उशिरा रात्री घरी बोलावून घेतले आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली.


लखनऊ एडीसीपी विकास चंद्र त्रिपाठी यांनी सांगितले की, तरुणीच्या कुटुंबीयांनी प्रथम मारून मारून तरुणीची हत्या केली आणि त्यानंतर पुरुषाची हत्या केली. आम्ही चार लोकांना अटक केली आहे. पूर्ण घटनेचा तपास करून नेमका काय प्रकार याचा शोध घेत आहोत. प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार प्रेमसंबंधामुळे घडलेला आहे.

 

 

 

Web Title: Double murder happen in uttar pradesh, two with mother - father arrested by police pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.