Crime News: दोस्त दोस्त ना रहा... मित्राच्या मदतीसाठी बायकोचे दागिने दिले, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 23:16 IST2023-01-27T23:13:47+5:302023-01-27T23:16:31+5:30
अंबाला जिल्ह्यातील दुखेडी निवासी सतिश कुमार यांची त्यांचे शेजारी रणदीपसिंह यांच्यासोबत मैत्री होती

Crime News: दोस्त दोस्त ना रहा... मित्राच्या मदतीसाठी बायकोचे दागिने दिले, पण...
हरयाणाच्या अंबाला जिल्ह्यात दोस्त दोस्त ना रहा... म्हणायची वेळ एका मित्रावर आली आहे. कारण, आपल्या बायकोचे दागिने देऊन मित्राची मदत केली, पण त्या मित्राने दागिने परत करण्याऐवजी मित्रावरच दुचाकी चोरल्याचा खोटा खटला दाखल केला. पडाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हे प्रकरण असून दुखेडी गावातील घटना आहे. याप्रकरणी पीडित युवकाने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करुन न्याय मिळण्याची मागणी केली आहे.
अंबाला जिल्ह्यातील दुखेडी निवासी सतिश कुमार यांची त्यांचे शेजारी रणदीपसिंह यांच्यासोबत मैत्री होती. जुलै २०२२ मध्ये रणदीपसिंह यांनी गरज असल्याकारणाने सतिशकडे १ लाख रुपये उधार मागितले. १५ दिवसांत पैसे वापस करतो, असे म्हणत ही मागणी केली. मात्र, सतिशकडे रणदीपची मदत करण्यासाठी तेवढे पैसे नव्हते. त्यामुळे, सतिशने आपल्या पत्नीचे रमनप्रीतचे दागिने, सोन्याची चैन आणि अंगठी १ ऑगस्ट २०२२ रोजी रणदीपसिंह यांना दिली. यावेळी, त्याचा मोठा भाऊ सुशील कुमार, दोस्त दिग्विजय सिंह, जितेंद्र व दलीप सिंह हेही उपस्थित होते. दरम्यान, यावेळी सिक्योरिटी म्हणून रणदीप सिंहने आपली एक्टिवा सतिशला दिली. जेव्हा दागिने परत करेल, तेव्हा एक्टीव्हा घेऊन जाईल, असा व्यवहार दोघांचा ठरला होता.
दरम्यान, रणजीतसिंहने गाडी परत मागितली, पण सतिशकडून या गाडीचा अपघात झाला होता. त्यामुळे, गाडीच्या दुरुस्तीचा जो खर्च असेल तो मी देतो, असे सतिशने म्हटले. मात्र, रणदीपसिंहने ती गाडी विकत घेण्यासाठी सतिशवर दबाव टाकला. मात्र, सतिशला गाडी खऱेदी करायची नव्हती. त्यामुळे, रणदीपसिंहने माझ्याविरुद्ध गाडी चोरीची खोटी तक्रार पोलिसांत दाखल केली. विशेष म्हणजे अद्यापही सतिशच्या पत्नीचे दागिने रणदीपसिंहने परत केले नाहीत. मात्र, पडाव पोलिसांनी आरोपी सतिशविरुद्ध ४०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.