शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मालाडमध्ये श्वानावर अत्याचार, रात्री उशिरा घडला प्रकार; पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:53 IST

यादव आणि शेख यांनी त्या व्यक्तीकडे विचारणा करताच ती व्यक्ती उलट ओरडू लागली. त्यामुळे क्लिनिकमधील इतर कर्मचारी बाहेर आले.

मुंबई - श्वानावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मालाड पश्चिम येथील ऑर्लेम परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी नरेश राजाराम चांदुलकर (४५, रा. संजय मुद्रा चाळ, मालाड पूर्व) याच्याविरुद्ध २७ एप्रिलला  गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. नीलिमा वेटर्निटी क्लिनिक येथील ॲनिमल हँडलर महेश यादव (रा. ऑर्लेम, मालाड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. २६ एप्रिलला रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास रुक्साना शेख (रा. मालवणी) या त्यांच्या मांजरावर उपचार करून क्लिनिकबाहेर पडल्या असताना त्यांनी यादव यांना बोलावले. त्यावेळी तेथे एक व्यक्ती क्लिनिकच्या शेजारील पदपथावरील श्वानावर अत्याचार करीत होती. संबंधित श्वान हा जवळील दूध डेअरीच्या मालकाचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

यादव आणि शेख यांनी त्या व्यक्तीकडे विचारणा करताच ती व्यक्ती उलट ओरडू लागली. त्यामुळे क्लिनिकमधील इतर कर्मचारी बाहेर आले. दरम्यान, श्वान मालकालाही बोलावण्यात आले. त्यानंतर क्लिनिकमधील जुई कुडतरकर यांनी पोलिसांच्या १०० क्रमांकाच्या हेल्पलाइनवर माहिती देण्यात आली. मालाड पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्यावर पुढील कारवाई पोलिस करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Malad: Man arrested for animal abuse; incident occurred late night.

Web Summary : A man was arrested in Malad for abusing a dog near Orlem. Naresh Rajaram Chandulkar, 45, was apprehended after a complaint by an animal handler. Witnesses saw him abusing the dog, leading to police intervention and his arrest.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी