शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

जागा काय तुमच्या बापाची आहे काय?, माजी आमदार विनायक निम्हण यांच्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 12:48 IST

आमच्या जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न निम्हण यांचा दावा

ठळक मुद्देतुझा बाप वाचला आता मी तुला सोडणार नाही, अशी धमकी देऊन शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. या फिर्यादीवरुन चतु:श्रृंगी पोलिसांनी संजय जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.   विनायक निम्हण या सर्व प्रकाराबाबत विनायक निम्हण यांनी सांगितले की, हा सुमारे २० एकरचा प्लॉट असून त्यातील काही जागेची विक्री करण्यात आली आहे.

पुणे : बाणेर येथील जागेवर अतिक्रमण करण्याच्या वादातून माजी आमदार विनायक निम्हण व त्यांचे पुत्र सनी निम्हण यांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हा चतु:श्रृंगी पोलिसांनी दाखल केला आहे़ तर, यापूर्वी सनी निम्हण यांनी संजय जगताप यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे़ बाणेर येथील प्लॉट क्रमांक ३६, ६४ जवळ हा प्रकार घडला होता. याबाबत संजय तुकाराम जगताप (वय ३९, रा़ विठ्ठलनगर, सुतारवाडी, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यावरुन चतु:श्रृंगी पोलिसांनी माजी आमदार विनायक निम्हण आणि माजी नगरसेवक चंद्रशेखर ऊर्फ सनी निम्हण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या फिर्यादीनुसार संजय जगताप हे ६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता कामगारांना चहा देऊन खुर्चीवर बसले असताना निम्हण यांनी त्या ठिकाणी येऊन कामगारांना शिवीगाळ करुन जागा काय तुमच्या बापाची आहे काय, असे बोलल्याने जगताप हे खुर्चीवरुन उठले असता आरोपींनी हातातील लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या हातावर डोक्यात व पोटावर मारुन जखमी केली़ असे फिर्यादीत म्हटले आहे. संजय जगताप यांच्याविरुद्ध सनी निम्हण यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निम्हण यांची बाणेर येथील सर्व्हे नं. ३९/५ येथे जागा आहे. या जागेवर संजय जगताप व त्याच्या इतर साथीदारांनी १ जुलै रोजी दुपारी २ वाजता अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला सनी निम्हण व रखवालदार विपुलकुमार सिंग यांनी प्रतिकार केला होता. ६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता विपुलकुमार सिंग यांनी फोन केल्याने सनी निम्हण हे त्यांच्या जागेवर पोहचले. तेव्हा संजय जगताप व इतर लोक त्यांच्या जागेच्या बोर्डाला काळा रंग लावण्याचा प्रयत्न करीत होते़ व श्रीकांत दिंगबर कुलकर्णी व कुलदिपसिंग जगजीत सोहल यांच्या नावावर बोर्ड लावण्याचा प्रयत्न करीत होते. इतर लोक पत्र्याचे शेड टाकण्याचे काम करीत होते. सनी निम्हण यांनी संजय जगताप यांना विचारल्यावर त्यांनी हा बोर्ड मला कुलकर्णी यांनी लावायला सांगितले आहे. तू मध्ये पडू नको, नाही तर मी तुला संपवून टाकतो. तुझा बाप वाचला आता मी तुला सोडणार नाही, अशी धमकी देऊन शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. या फिर्यादीवरुन चतु:श्रृंगी पोलिसांनी संजय जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

 

आमच्या जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न

 विनायक निम्हण या सर्व प्रकाराबाबत विनायक निम्हण यांनी सांगितले की, हा सुमारे २० एकरचा प्लॉट असून त्यातील काही जागेची विक्री करण्यात आली आहे. गेली २० वर्षे हा प्लॉट आमच्या ताब्यात असून महापालिकेनेही त्यात काही बदल करायला स्थगिती दिली. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाने आपल्याला पॉवर ऑफ ऍटर्नी दिल्याचे संजय जगताप म्हणतो़ या संजय जगताप यानेच आपल्याला यापूर्वी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात संजय जगताप याला न्यायालयाने ५ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सध्या ते जामीनावर सुटले आहे. त्याची जागा कोठे आहे. ती त्याने शोधावी़ त्यासाठी सरकारी मोजणी करावी़ पण ते सोडून तो आमच्या जागेत अतिक्रमण करत आहे. याबाबत संजय जगताप यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला़ परंतु तो होऊ शकला नाही. 

टॅग्स :PoliceपोलिसMLAआमदारPuneपुणे