अंगावर पाणी उडवू नको सांगितल्याने डॉक्टरास बेदम मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 20:29 IST2020-12-26T20:28:00+5:302020-12-26T20:29:13+5:30

Assaulting : नगर शहरातील गावडे मळा येथील इस्कान मंदिराजळील साफल्य निवास येथे शनिवारी (दि.२६) सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. 

The doctor was beaten up for telling him don't blow water on his body | अंगावर पाणी उडवू नको सांगितल्याने डॉक्टरास बेदम मारहाण 

अंगावर पाणी उडवू नको सांगितल्याने डॉक्टरास बेदम मारहाण 

ठळक मुद्देया प्रकरणी डॉक्टर अक्षयकुमार अनिल साठे (वय ३०) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गावडे (पूर्ण नाव माहित नाही), सुवर्णा गावडे, विवेक गावडे व गावडे याच्यासाहेब पिवळा शर्ट घातलेला अनोळखी व्यक्ती ( सर्व रा. गावडे मळा) आदींच्या विरोधात मारहाणीच

अहमदनगर - अंगावर पाणी उडवू नको असे सांगितल्याने चौघांनी डॉक्टरला लोखंडी रॉड व लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. नगर शहरातील गावडे मळा येथील इस्कान मंदिराजळील साफल्य निवास येथे शनिवारी (दि.२६) सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. 

या प्रकरणी डॉक्टर अक्षयकुमार अनिल साठे (वय ३०) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गावडे (पूर्ण नाव माहित नाही), सुवर्णा गावडे, विवेक गावडे व गावडे याच्यासाहेब पिवळा शर्ट घातलेला अनोळखी व्यक्ती ( सर्व रा. गावडे मळा) आदींच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अक्षयकुमार साठे हे शनिवारी सकाळी त्यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये बसलेले असताना गावडे नावाचा व्यक्ती हा त्याच्या घराच्यावरील मजल्यावर गॅलरीच्या भिंतीला पाणी मारत होता. हे पाणी अक्षयकुमार यांच्या अंगावर पडले. यावेळी त्यांनी गावडे याला दुसरीकडे पाणी मारा असे सांगितले. याचाच राग येऊन गावडे व इतर तिघांनी डॉक्टरच्या कंपाउंटमध्ये घुसून त्यांना मारहाण करत जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक जाधव हे पुढील तपास करत आहेत. 

Web Title: The doctor was beaten up for telling him don't blow water on his body