डॉक्टरने गुंगीचा पदार्थ देऊन महिला कॉन्स्टेबलवर केला बलात्कार आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 18:37 IST2021-09-29T18:34:47+5:302021-09-29T18:37:22+5:30
Rape Case : आरोपी डॉक्टरची कारागृहात रवानगी करण्यात आहे. ज्याने आपल्या हातांनी या व्यवसायाला काळिमा फसला आहे..

डॉक्टरने गुंगीचा पदार्थ देऊन महिला कॉन्स्टेबलवर केला बलात्कार आणि मग...
लखनौ: उत्तर प्रदेशची (यूपी) राजधानी लखनऊमध्ये एका महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका सरकारी डॉक्टरलाअटक करण्यात आली आहे. पीडित पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यात लिहिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी डॉक्टरने नशेच्या अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला होता.
रात्री उशिरा अटक
या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपी डॉक्टरच्या शोधात छापे टाकत होते, अखेर मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. या प्रकरणी २३ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. तक्रारीनुसार, डॉक्टरने तिच्यावर हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता, तिला उपचाराच्या बहाण्याने तिला नशेचे औषध देऊन बेशुद्ध केले.
खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्मhttps://t.co/avOcDYzpaV
— Lokmat (@MiLOKMAT) September 29, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरची कारागृहात रवानगी करण्यात आहे. ज्याने आपल्या हातांनी या व्यवसायाला काळिमा फसला आहे.. त्याचप्रमाणे पीटीआय या वृत्तसंस्थेत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शनिवारी मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात (एमपी) एका महिला कॉन्स्टेबलवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.