ज्या रेप केससाठी 'तो' तुरूंगात कैद होता तो त्याने केलाच नाही, DNA टेस्टमुळे झाला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 11:01 AM2021-04-03T11:01:54+5:302021-04-03T11:04:15+5:30

अमित नावाची ही व्यक्ती फरीदाबादमध्ये काम करत होती. २०१८ च्या जुलैमध्ये आपल्या मोठ्या भावाच्या लग्नासाठी तो गावी आला होता.

DNA test gives clean chit to rape accused who spent 26 months in jail Aligarh up police | ज्या रेप केससाठी 'तो' तुरूंगात कैद होता तो त्याने केलाच नाही, DNA टेस्टमुळे झाला खुलासा!

ज्या रेप केससाठी 'तो' तुरूंगात कैद होता तो त्याने केलाच नाही, DNA टेस्टमुळे झाला खुलासा!

Next

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) अलीगढ़ (Aligarh) च्या तुरूंगात गेल्या २६ महिन्यांपासून कैद एका व्यक्तीवर रेपचा (Rape Fake Case) खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिलेच्या बाळाची डीएनए टेस्ट (DNA Test) केल्यावर याचा खुलासा झाला. या टेस्टमधून समोर आले की, तुरूंगात कैद असलेली व्यक्ती पीडित महिलेच्या बाळाचा वडील नाही.

रेपचा खोटा गुन्हा

अमित नावाची ही व्यक्ती फरीदाबादमध्ये काम करत होती. २०१८ च्या जुलैमध्ये आपल्या मोठ्या भावाच्या लग्नासाठी तो गावी आला होता. याच्या सात महिन्यांनंतर २०१९ च्या फेब्रुवारीमध्ये पोलिसांनी त्याला बोलवलं आणि एका मुलीच्या रेप केसमध्ये त्याला दोषी ठरवलं. अमितची आई आणि त्याच्या वहिनीला आधीच ताब्यात घेतलं होतं. अमित तिथे गेला आणि त्यालाही अटक झाली.

अमितचे वडील सज्जन सिंह यांनी सांगितले की, जमीनच्या कारणावरून पीडितेच्या वडिलांसोबत त्यांचा काही वाद झाला होता. त्या कारणामुळे त्यांच्या परिवाराविरोधात हा कट रचला आहे.  (हे पण वाचा : लग्नाच्या तीन महिन्यानंतर सासरचे १५ लाख लुटून फरार झाल्या दोन सूना, दोन बहिणींकडून दोन भावांची फसवणूक!)

अमितवर रेप आणि पॉक्सो अॅक्टनुसार आरोप लावण्यात आले. तर त्याचा भाऊ चंद्रशेखरवर मारझोडीचा आरोप लावला गेला. लहान भाऊ सुनील आणि एका नातेवाईकावर पोलीस स्टेशनमध्ये अपराधिक धमकी आणि घरात जबरदस्ती घुसण्याचा गुन्हा दाखल केला.

चंद्रशेखरला जामीन मिळाला. सुनील आणि नातेवाईकावरीलही गुन्हे नंतर हटवण्यात आले. त्यांच्या विरोधात पुरावे नव्हते. पण यादरम्यान अमित अलीगढ येथील तुरूंगात कैद होता. (हे पण वाचा : पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला, मृतदेह पाहून पोलिसही हादरले)

असा निर्दोष सुटला

अमितचे वकिल हरिओम वार्ष्णेय म्हणाले की, त्यांनी कोर्टात पीडितेच्या बाळाच्या डीएनए टेस्ट करण्याची मागणी केली होती. जेणेकरून हे जाणून घेता यावं की, खरंच अमितने तिच्यासोबत रेप केला की नाही. ज्यामुळे ती प्रेग्नेंट झाली होती. गेल्या मार्चला अमित आणि पीडितेच्या बाळाचे सॅम्पल घेतले गेले. आता समोर आलेल्या रिपोर्टमधून खुलासा झाला की, अमित त्या बाळाचा पिता नाही. अमितचे वकिल म्हणाले की, आता ते आपल्या क्लाएंटला सर्व आरोपांमधून मुक्त करण्यासाठी याचिका दाखल करणार आहेत. ज्या कारणांसाठी त्याला कैद झाली.
 

Web Title: DNA test gives clean chit to rape accused who spent 26 months in jail Aligarh up police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.