दोन लाखांची लाच स्वीकारणारा जिल्हा उपनिबंधक, विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 04:48 PM2020-07-09T16:48:05+5:302020-07-09T16:54:04+5:30

पाच लाखांची मागणी : वेतननिश्चिती व अ‍ेरियसच्या प्रस्तावा मान्यता देण्यासाठी मागितली लाच

District Deputy Registrar, Assistant Commissioner of Sales Tax arrested who accepted a bribe of Rs 2 lakh | दोन लाखांची लाच स्वीकारणारा जिल्हा उपनिबंधक, विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त गजाआड

दोन लाखांची लाच स्वीकारणारा जिल्हा उपनिबंधक, विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त गजाआड

Next
ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९ जुलै रोजी सापळा रचला. याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली.

अकोला - कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती व अ‍ेरियसच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विक्रीकर विभागाचे साहाय्यक आयुक्त अमर शेट्टी यांच्यामार्फत जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी दोन लाख रूपयांची तक्रारदाराकडून लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)च्या अधिकाऱ्यांनी ९ जुलै रोजी सापळा रचून रंगेहात अटक केली.

तक्रारदाराने १० जून रोजी एसीबीकडे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे स्वत:चे व त्यांच्या अधिनस्थ असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सातव्या वतन आयोगानुसार वेतन निश्चिती आणि अ‍ेरियसच्या प्रस्ताव मान्यता देण्यासाठी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी विक्रीकर विभागाचे साहाय्यक आयुक्त अमर शेट्टी यांच्यामार्फत पाच अ‍ेरियस रकमेच्या ५0 टक्के रकमेची प्रथम मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदारास पाच लाख रूपयांची लाच मागितली. या दोन्ही अधिकाऱ्यांविरूद्ध तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक एस.एस. मेमाणे यांनी पडताळणी केली असता, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे यांनी विक्रीकर विभागाचे साहाय्यक आयुक्त अमर शेट्टी यांच्यामार्फत तक्रारदाराला लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी अर्धी रक्कम देण्याबाबत त्यांच्या सहमती झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९ जुलै रोजी सापळा रचला. दरम्यान, विक्रीकर विभागाचे सहाय्यक आयुक्त अमर शेट्टी यांनी तक्रारदाराकडून दोन लाख रूपयांची लाच स्विकारली. याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...

Web Title: District Deputy Registrar, Assistant Commissioner of Sales Tax arrested who accepted a bribe of Rs 2 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.