पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने दुकानाची नासधूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 21:19 IST2019-05-13T21:17:50+5:302019-05-13T21:19:43+5:30

दुकानदाराच्या तक्रारीवरून तुळींज पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

Disruption of the shop after filing a case in the police station | पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने दुकानाची नासधूस

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने दुकानाची नासधूस

ठळक मुद्देआशिषकुमार नंदलाल गुप्ता (34) यांनी त्याच परिसरात राहणाऱ्या अंकित विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता.शनिवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास गेले होते त्यांना पाहून दुकानाच्या पाठीमागील दारातून पळून गेले.

नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील संतोषभवन भवन परिसरात दुकानदाराने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला म्हणून राग मनात ठेवून मारहाण करण्यास गेले पण दुकानदार पळून गेल्याने दुकानाची नासधूस केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली आहे. दुकानदाराच्या तक्रारीवरून तुळींज पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

संतोष भवन परिसरातील गौराईपाडा येथील शितलादेवी वेल्फेअर सोसायटीच्या रूम नंबर 1 मध्ये आशिषकुमार नंदलाल गुप्ता (34) यांनी त्याच परिसरात राहणाऱ्या अंकित विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. याचाच राग मनात धरून अंकित याने तीन मित्रांना घेऊन गुप्ता याला मारण्यासाठी दुकानात शनिवारी संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास गेले होते त्यांना पाहून दुकानाच्या पाठीमागील दारातून पळून गेले. अंकित याने त्याच्या तीन मित्रांसह दुकानाच्या किराणा मालाची व इतर सामानाची नासधूस करून तोडफोड केली. 

Web Title: Disruption of the shop after filing a case in the police station