संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 12:33 IST2025-07-15T12:31:58+5:302025-07-15T12:33:00+5:30

Crime UP : या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन्ही शूटरनी सोमवारी न्यायालयात आत्मसमर्पण करत सत्य उघड केलं.

Dispute over property escalates, wife bids just Rs 10 lakh for husband's life! She gives money to killers | संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  

संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  

पटनाच्या खगौल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ जुलै रोजी घडलेल्या स्कूल संचालिका रीता सिन्हा यांचे पती अजित कुमार यांच्या हत्येप्रकरणी एक अत्यंत धक्कादायक सत्य समोर आलं आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन्ही शूटरनी सोमवारी न्यायालयात आत्मसमर्पण केलं असून, या हत्येची सूत्रधार खुद्द त्यांची पत्नीच असल्याचं उघड झालं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या १० लाख रुपयांची सुपारी देऊन घडवून आणण्यात आली होती. मालमत्तेच्या वादातून रीता सिन्हा यांनी आपल्याच पतीची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी रीता सिन्हा आणि त्यांचा ड्रायव्हर मंसू याला यापूर्वीच अटक करून तुरुंगात पाठवलं आहे. मंसूने या हत्येमध्ये 'लाइनर'ची भूमिका बजावली होती, म्हणजेच त्याने शूटरना माहिती पुरवली होती.

गुन्हेगारांनी केलं आत्मसमर्पण

गेल्या काही दिवसांपासून पोलीस या हत्येतील फरार शूटरच्या मागावर होते. पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे अखेर शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिकारपूर येथील रहिवासी रौशन कुमार आणि विजेंद्र कुमार या दोन शूटरनी सोमवारी न्यायालयात आत्मसमर्पण केलं. आता पोलीस या दोघांना रिमांडवर घेऊन हत्येसाठी वापरलेली शस्त्रे जप्त करण्यासाठी अधिक चौकशी करणार आहेत.

नगर पोलीस अधीक्षक (पश्चिम) भानू प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रीता सिन्हा आणि अजित कुमार यांच्यात मालमत्तेवरून मोठा वाद सुरू होता. याच वादातून रीता सिन्हा यांनी हे क्रूर कृत्य घडवून आणलं. या घटनेमुळे संपूर्ण पटना शहरात एकच खळबळ उडाली असून, पती-पत्नीच्या नात्यातील विश्वास आणि माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Web Title: Dispute over property escalates, wife bids just Rs 10 lakh for husband's life! She gives money to killers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.