मित्रांचा वाद विकोपाला; घरी बोलावून झाडली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 13:04 IST2019-09-26T12:58:19+5:302019-09-26T13:04:14+5:30

गोळीबारात एक जण ठार

Dispute of friends; One killed in gunfire | मित्रांचा वाद विकोपाला; घरी बोलावून झाडली गोळी

मित्रांचा वाद विकोपाला; घरी बोलावून झाडली गोळी

ठळक मुद्देदोघे अटकेत

लातूर : दोघा मित्रातील वाद विकोपाला गेल्याने त्याचे पर्यावसान गोळीबारात झाले़ ही घटना मंगळवारी रात्री उशिरा प्रकाशनगरात घडली़ त्यात राहुल मन्नाडे हा ठार झाला असून,  मयताचा मित्र आणि त्याच्या वडिलांना एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे़ 

राहुल मन्नाडे (रा. पाखरसांगवी ता. लातूर) आणि अमोल ऊर्फ गणेश अण्णासाहेब गायकवाड (रा. प्रकाश नगर, लातूर) या दोघांमध्ये मंगळवारी रात्री बाचाबाची झाली. दरम्यान, अमोल ऊर्फ गणेश गायकवाड याने राहुल मन्नाडे यास घरी बोलाविले़ तेव्हाही दोघांमधील वाद मिटला नाही. तो अधिक विकोपाला गेला़ त्यातून राहुल मन्नाडे याच्यावर अमोलने बंदुकीतून गोळी झाडण्यात आली. दरम्यान, जखमी झालेल्या राहुल मन्नाडेला त्याच्या काही मित्रांनी लातूरच्या शासकीय व सर्वोपचार रुग्णालयात मंगळवारी रात्री उशिरा दाखल केले. दरम्यान,  राहुलचा उपचारादरम्यान बुधवारी सकाळी मृत्यू झाला. 

या प्रकरणी विकास ऊर्फ विक्की युवराज मन्नाडे (२४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अमोल ऊर्फ गणेश अण्णासाहेब गायकवाड, अण्णासाहेब सदाशिव गायकवाड या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. तपास पोउपनि. एस.ए. शिरसेवाड करीत आहेत.

पोलिसांकडून कारणांचा शोध
गोळीबाराची घटना समजताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, सदरची घटना नेमकी कोणत्या कारणावरुन घडली, हे अजून पुढे आले नाही. मयत राहुल मन्नाडे याच्यावर गोळी झाडल्या प्रकरणात पिता-पुत्रावर गुन्हा दाखल झाला आहे़ त्यात नेमकी कोणी गोळी झाडली, याचा शोध पोलीस घेत आहेत, असे अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी सांगितले़  

Web Title: Dispute of friends; One killed in gunfire