दिशा सालियन मृत्यूचे सुशांत प्रकरणाशी संबंध आहे का? धागेदोरे शोधतेय सीबीआय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 20:21 IST2020-09-03T20:20:33+5:302020-09-03T20:21:31+5:30

कंपनीच्या डायरेक्टरची चौकशी

Is Disha Salian's death related to Sushant case? The CBI is looking for the connection | दिशा सालियन मृत्यूचे सुशांत प्रकरणाशी संबंध आहे का? धागेदोरे शोधतेय सीबीआय

दिशा सालियन मृत्यूचे सुशांत प्रकरणाशी संबंध आहे का? धागेदोरे शोधतेय सीबीआय

ठळक मुद्देसुशांत आणि दिशा यांच्या मृत्यूशी काही संबंध आहे का ? याची चौकशी आता सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी करायला सुरुवात केली आहे. 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मृत्यूच्या तपासाचा गुंता सोडवत असताना सीबीआय आता सुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूशी संबंधित धागेदोरे सापडतात का पाहत आहे. सीबीआयच्या हाती आतापर्यंत हत्येबाबत ठोस पुरावा मिळालेला नाही. सीबीआयच्या तपासात नवीन वळण लागले आहे. सुशांतच्या घटनेला असिस्टंट मॅनेजर दिशाच्या मृत्यूशी जोडण्याकडेही तपास यंत्रणेचा कल आहे. सुशांत आणि दिशा यांच्या मृत्यूशी काही संबंध आहे का ? याची चौकशी आता सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी करायला सुरुवात केली आहे. त्याचा तपास सुरू झाला असून गुरुवारी दिशाची कंपनी कॉर्नरस्टोनचे संचालक अर्जुन सजदेह यांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले, अशी माहिती नवभारत टाईम्सने दिली आहे. 


श्रुती सुट्टीवर गेली, दिशा आली
गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास कॉर्नरस्टोनचे संचालक अर्जुन सजदेह डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले. दिशा सालियनबरोबर श्रुती मोदी देखील या कंपनीत काम करत होती. या कंपनीने सुशांतचे प्रोफाइल व्यवस्थापित केले. श्रुती मोदी काही दिवस सुट्टीवर गेली होती, जेव्हा दिशा सालियन हिची कंपनीने सुशांतसाठी नियुक्त केले होते. सीबीआय या कंपनीतील कर्मचारी बंटी सजदेह याचीही चौकशी करत आहे.



८ जून रोजी दिशाचा मृत्यू, रिया त्याच दिवशी घराबाहेर पडली
दिशा सालियन हिचे ८ जून रोजी मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडल्यानंतर निधन झाले. रिया चक्रवर्ती त्याच दिवशी सुशांतचे घर सोडली. त्यानंतर 14 जून रोजी सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूची बातमी आली. दिशाच्या मृत्यूमुळे सुशांत खूप नाराज असल्याचे समोर आले आहे. दिशाच्या मृत्यूने काळजीत असलेल्या सुशांतचे नाव दिशाशी देखील जोडले जात होते.

एनसीबी शौविकची चौकशी करेल
या बाबींकडे पाहता सीबीआयने दिशा सालियन आणि सुशांतच्या मृत्यूशी संबंधित संबंध शोधण्याचा विचार केला आहे. गुरुवारी सीबीआय रिया चक्रवर्ती हिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांचीही चौकशी करत आहे. तर सुशांतचे मानसोपचार तज्ज्ञ सुसान वॉकरही डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे जबाब नोंदवण्यासाठी पोहोचले. रियाचे वडील व तिचा भाऊ शौविक हे तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. चॅट आणि आरोपी ड्रग सप्लायर्सच्या अटकेनंतर शौविकचे नाव समोर आले आहे, त्यामुळे एनसीबी त्यांचीही चौकशी करणार आहे.

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

 

ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

 

मथुरेत परदेशी तरुणीवर पाकिस्तानी युवकाकडून बलात्कार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Web Title: Is Disha Salian's death related to Sushant case? The CBI is looking for the connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.