किळसवाणा प्रकार! चॉकलेट व चिप्सचे आमिष दाखवून काकाने पुतण्यावर केले लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 18:28 IST2020-10-07T18:27:25+5:302020-10-07T18:28:07+5:30
Crime News : आरोपीस अटक : हिंगणघाट येथील घटना

किळसवाणा प्रकार! चॉकलेट व चिप्सचे आमिष दाखवून काकाने पुतण्यावर केले लैंगिक अत्याचार
वर्धा : चॉकलेट व चिप्सचे आमिष दाखवून सहा वर्षीय बालकावर त्याच्या काकानेच अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी पोलिसांनी २७ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
राजस्थान हादरलं! अल्पवयीन मुलीचं अपहरण करून बलात्कार, अश्लील व्हिडीओ अन् फोटो काढले
आरोपी हा पीडित मुलाचा काका असल्याने घरी येणे-जाणे असायचे. आरोपी हा दारु पिण्याच्या सवयीचा असल्याने त्यास घरात येऊ देत नव्हते. मंगळवारी आरोपी पीडित मुलाच्या घरी आला असता मुलगा अंगणात खेळत होता. आरोपीने त्यास चॉकलेटचे आमिष दाखवून घराच्या वरच्या मजल्यावर नेत त्याच्यावर अत्याचार केला. मुलाने आरडाओरड करताच घरातील मंडळींनी धाव घेतली असता आरोपीने तेथून पळ काढला. हिंगणघाट पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पोस्कोच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.