शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

'त्या' ट्विटवरून वाढल्या दिग्विजय सिंह यांच्या अडचणी, भाजपाने दाखल केला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 7:21 PM

राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री असलेले दिग्विजय सिंह यांनी सोमवारी मध्य प्रदेश भाजपाच्या आयटी सेलचे संयोजक शिवराज सिंह डाबी यांच्या संदर्भात एक ट्विट केले.

ठळक मुद्देदिग्विजय सिंह यांनी मला एफबीआयचे इंडियन सायबर फ्युजीटिव म्हटले आहे आणि समाजात माझी बदनामी करण्याच्या हेतूने माझ्यावर निराधार आरोप केले आहेत.दिग्विजय सिंह यांच्याविरूद्ध योग्य ती कारवाई केली जावी, जेणेकरून ते पुन्हा असे निराधार आरोप करु शकणार नाहीत.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्याविरोधात भाजपाने पुन्हा एकदा पोलीस ठाणे गाठले आहे. भाजपाने भोपाळ गुन्हे शाखेत लेखी तक्रार केली असून त्यावर दिग्विजय यांनी दिशाभूल करणारे ट्विट केल्याचा आरोप केला आहे. भाजपा आयटी सेलचे राज्य आयटी संयोजक शिवराज सिंह डाबी यांना दिलेल्या ट्विटसंदर्भात दिग्विजय यांच्याविरूद्ध ही तक्रार केली आहे.

 

राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री असलेले दिग्विजय सिंह यांनी सोमवारी मध्य प्रदेश भाजपाच्या आयटी सेलचे संयोजक शिवराज सिंह डाबी यांच्या संदर्भात एक ट्विट केले. या ट्विटमध्ये दिग्विजय सिंह यांनी विचारले की एफबीआयच्या मोस्ट वांटेड यादीमध्ये कोणाचे नाव आहे तेच शिवराज डाबी आहेत काय? या ट्विटबरोबरच दिग्विजय सिंह यांनी दोन फोटोही पोस्ट केले होते, ज्यामध्ये एका फोटोत शिवराज सिंह डाबी यांचा आहे, तर दुसर्‍या फोटोमध्ये डाबी यांचे फुले देऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वागत करताना दिसत आहेत. दुसर्‍या ट्विटमध्ये दिग्विजयने एक फोटो शेअर केला आहे. याशिवाय दिग्विजय सिंह यांनी या विषयावर आणखी तीन ट्विट केले आहे. या ट्वीटमुळे भाजपाने गुन्हे शाखेत पोहोचून दिग्विजय सिंग यांच्याविरोधात तक्रार दिली की, दिग्विजय सिंह यांनी शिवराज सिंह दाबी यांची प्रतिमेला डाग लावण्याच्या उद्देशाने ट्विटर अकाऊंटवरून जाणूनबुजून शेअर केली आहे.शिवराज सिंह डाबी म्हणतात की, दिग्विजय सिंह यांनी मला एफबीआयचे इंडियन सायबर फ्युजीटिव म्हटले आहे आणि समाजात माझी बदनामी करण्याच्या हेतूने माझ्यावर निराधार आरोप केले आहेत. दिग्विजय सिंह यांना याची जाणीव आहे की, अमेरिकेच्या कोणत्याही कोर्टामध्ये माझ्याविरोधात कोणताही खटला प्रलंबित नाही, किंवा सध्या कोणतीही तपास यंत्रणा माझ्या विरोधात चौकशी करीत आहे. असे असूनही ते म्हणाले की, दिग्विजय सिंह यांनी माझी व माझ्या कुटुंबाची प्रतिमा खराब करण्यासाठी बिनबुडाचे आरोप केले आहेत. दिग्विजय सिंह यांच्यावतीने ट्विट केल्यापासून माझे मित्र, ओळखी आणि नातेवाईकांकडून अनेकदा फोनवर विचारपूस केली गेली आहे. त्यामुळे माझे आणि माझ्या कुटुंबाचा अपमान झाला आहे. डाबी म्हणाले की, म्हणूनच मी अशी मागणी केली आहे की, दिग्विजय सिंह यांच्याविरूद्ध योग्य ती कारवाई केली जावी, जेणेकरून ते पुन्हा असे निराधार आरोप करु शकणार नाहीत.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

अज्ञात महिलेचा मृतदेह टेम्पोत आढळल्याने खळबळ

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहTwitterट्विटरMadhya Pradeshमध्य प्रदेशcyber crimeसायबर क्राइम