Dhirendra Singh, the main accused in the Ballia firing case, has applied to the court for surrender | बलिया गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपी धीरेंद्र सिंगने आत्मसमर्पणासाठी केला कोर्टात अर्ज 

बलिया गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपी धीरेंद्र सिंगने आत्मसमर्पणासाठी केला कोर्टात अर्ज 

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रेवती पोलिस स्टेशन परिसरातील दुर्जनपूर गावात सरकारी कोट्याच्या दुकानात गोळ्या घालून जय प्रकाश उर्फ गमा पाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपीच्या अटकेसाठी डीआयजी आजमगड रेंजने ५०-५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

बलिया: बलिया (यूपी) प्रकरणातील मुख्य आरोपी धीरेंद्र प्रताप सिंग यांनी बलिया कोर्टात शरणागतीचा अर्ज दिला आहे. आरोपीने स्थानिक न्यायालयात “सरेंडर अर्ज” दाखल केला आहे. अशा अर्जामुळे आरोपीला संबंधित कोर्टासमोर थेट आत्मसमर्पण करण्याची परवानगी मिळते, त्यानंतर त्याला पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत पाठवायचे की नाही हे ठरवले जाते. 

आतापर्यंत या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली असून यामध्ये धीरेंद्र सिंगचा भाऊ आणि पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. धीरेंद्र सिंग आणि अन्य पाच जण सध्या फरार आहेत. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रेवती पोलिस स्टेशन परिसरातील दुर्जनपूर गावात सरकारी कोट्याच्या दुकानात गोळ्या घालून जय प्रकाश उर्फ गमा पाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपीच्या अटकेसाठी डीआयजी आजमगड रेंजने ५०-५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. एसपी बलिया यांनी फरार आरोपींना यापूर्वी 25-25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.


दुर्जनपूर खेड्यात स्वयंसहायता गटांच्या सदस्यांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी रेशन दुकानांच्या वाटपासाठीच्या या बैठकीचे कामकाज थांबवल्यानंतर जय प्रकाश यांची हत्या झाली. भाजपचे स्थानिक आमदार सुरेंद्र सिंह यांचा धीरेंद्र सिंह हा भाऊ आहे. सुरेंद्र सिंह यांनी भावाला पाठीशी घालताना म्हटले की, ‘जर त्याने स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली नसती, तर त्याच्या कुटुंबातील डझनभर सदस्य आणि सहकारी ठार मारले गेले असते.’ पोलीस प्रशासनाने आमच्या बाजूने प्रथमदर्शनी ‘हलगर्जीपणा’ झाल्याचे मान्य करून रेवती पोलीस ठाण्याचे तीन उपनिरीक्षक आणि सहा कॉन्स्टेबल्सना निलंबित केले आहे.

आरोपींना पकडण्यासाठी धाडसत्र
नरेंद्र प्रतापसिंह यांच्यासह त्यांचा भाऊ व २२-२५ अज्ञात लोकांची नावे प्रथमदर्शनी अहवालात नोंदवण्यात आली आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी छापे टाकले जात आहेत, असे जिल्हा पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते. मुख्य आरोपी फरार आहे. घटनास्थळी दहा पोलीस कर्मचारी होते. ते गुन्हेगारांना वाचवत होते व आम्हाला मारहाण करीत होते. धीरेंद्र प्रताप सिंह हा गोळीबारानंतर पळून गेला व पोलिसांनी त्याला पकडले; परंतु त्यांनी त्याला जवळच्या बंधाºयावर नेऊन सोडून दिले, असे जय प्रकाश पालचे भाऊ तेज प्रताप पाल यांनी शुक्रवारी वार्ताहरांशी बोलताना सांगितले होते.

Web Title: Dhirendra Singh, the main accused in the Ballia firing case, has applied to the court for surrender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.