बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 17:51 IST2026-04-12T17:51:07+5:302026-04-12T17:51:55+5:30

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील गोंदीखेडा गावात झालेल्या देवकृष्ण पुरोहित हत्याप्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे.

dhar bedroom videos and that secret affair from 2020 another new page in crime file of unfaithful priyanka purohit | बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा

फोटो - tv9hindi

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील गोंदीखेडा गावात झालेल्या देवकृष्ण पुरोहित हत्याप्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणाचे एकामागून एक धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. या मर्डर मिस्ट्रीमध्ये आता काही 'बेडरूम व्हिडीओ' समोर आले आहेत, ज्यावरून हे स्पष्ट झालं आहे की घरातील हा मृत्यूचा थरार अचानक घडलेला नाही, तर हा कट बऱ्याच काळापासून रचला जात होता. या प्रकरणात देवकृष्णची बहीण ज्योतीने मोबाईलमध्ये काढलेले व्हिडीओ आता पोलिसांसाठी महत्त्वाचे पुरावे ठरले आहेत.

व्हिडिओमध्ये प्रियंकाचं हिंसक वागणं स्पष्टपणे दिसून येत आहे. एका व्हिडिओमध्ये देवकृष्ण पत्नी प्रियंकाला तिच्या फोन कॉलबाबत विचारणा करतो, ज्यावर ती प्रचंड संतापलेली दिसते. व्हिडिओमधील  धक्कादायक बाब म्हणजे खोलीत दोन वेगळी अंथरुणं दिसत आहेत. प्रियंकाने देवकृष्णला मानसिकदृष्ट्या इतकं छळला होतं की ते पती-पत्नीसारखे राहत नव्हते, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. देवकृष्णला अनेकदा जमिनीवर झोपायला भाग पाडलं जात असे. ज्योती प्रियंकाच्या या वागणुकीचा व्हिडीओ बनवू लागली, तेव्हा प्रियंकाने केवळ विरोधच केला नाही तर मोबाईल हिसकावून घेण्याचाही प्रयत्न केला. यावरून प्रियंकाला आपलं गुपित उघड होण्याची भीती होती, हे स्पष्ट होतं.

२०२० पासून सुरू होते 'सीक्रेट अफेअर'

प्रियंकाचे चारित्र्य आणि वागणं लग्नानंतर लगेचच संशयास्पद होतं असं नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं. २०२० पासून प्रियंकाचं एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध सुरू होते, असा आरोप आहे. याच कारणामुळे तिचं सासरच्या घरी मन लागत नसे आणि ती जास्तीत जास्त वेळ माहेरीच घालवत असे. जेव्हा कधी ती गोंदीखेडा येथे यायची, तेव्हा घरात वाद व्हायचे. ती जाहीरपणे देवकृष्णचा अपमान करायची आणि "तू माझ्या लायकीचा नाहीस, मला घटस्फोट दे" असं म्हणायची. प्रियंकाला तिचा प्रियकर कमलेशसोबत नवीन आयुष्य सुरू करायचं होतं आणि त्यात देवकृष्ण हा सर्वात मोठा अडथळा होता, असं कुटुंबाचं म्हणणं आहे.

तिसरा आरोपी सुरेंद्र फरार

७ एप्रिलच्या रात्री देवकृष्णची निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तातडीने तपास करत सर्व गोष्टी पाहिल्या असता संशयाची सुई प्रियंका आणि तिचा प्रियकर कमलेश यांच्याकडे वळली. या गुन्ह्यात प्रियंका, तिचा प्रियकर कमलेश आणि आणखी एक साथीदार सुरेंद्र भाटी यांचा सहभाग असल्याचं पोलिसांनी शोधून काढलं आहे. पोलिसांनी प्रियंका आणि कमलेशला अटक केली असून न्यायालयाने दोघांची रिमांड १३ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. सध्या तिसरा आरोपी सुरेंद्र भाटी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

"सून प्रियंकाने या घराला कधीच आपलं मानलं नाही"

देवकृष्णच्या आईने "सून प्रियंकाने या घराला कधीच आपलं मानलं नाही. ती नेहमी फोनवर कोणाशी तरी भांडत असायची किंवा गुपचुप बोलायची" असा आरोप त्यांनी केला. प्रियंकाचं वागणं अमानवीय होतं, तिने केवळ भावाचाच नाही तर संपूर्ण कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला, अशा भावना बहीण ज्योतीने व्यक्त केल्या. त्यासाठी वापरलेले शस्त्र कोठून आले आणि घटनेच्या वेळी नेमके कोण कोण उपस्थित होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. प्रियंका आणि कमलेशचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जात आहेत जेणेकरून या कटाचा सखोल तपास करता येईल. 
 

Web Title : हत्या के मामले में बेडरूम वीडियो से खुला प्रेम संबंध का राज।

Web Summary : मध्य प्रदेश में एक हत्या में प्रेम संबंध का खुलासा हुआ। बेडरूम वीडियो में पत्नी का पति के प्रति दुर्व्यवहार दिखा, जिसकी बाद में हत्या कर दी गई। पत्नी और उसके प्रेमी को गिरफ्तार किया गया; एक साथी फरार है। परिवार का दावा है कि पत्नी का 2020 से प्रेम संबंध था और वह अपने पति से छुटकारा पाना चाहती थी।

Web Title : Bedroom video exposes secret affair in murder case.

Web Summary : A murder in Madhya Pradesh reveals a secret affair. Bedroom videos show the wife's abusive behavior towards her husband, who was later murdered. She, along with her lover, has been arrested; another accomplice is at large. The family claims the wife was having an affair since 2020 and wanted to get rid of her husband.