धनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिलेचा यू-टर्न?; “मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे, पण...”

By प्रविण मरगळे | Published: January 15, 2021 11:12 AM2021-01-15T11:12:49+5:302021-01-15T11:23:52+5:30

या संपूर्ण घटनेत पोलीस सहकार्य करत नाही असा आरोप तक्रारदार महिलेच्या वकिलांनी केला होता

Dhananjay Munde Rape Allegation: "I'll take back what you want, Renu Sharma Tweet | धनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिलेचा यू-टर्न?; “मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे, पण...”

धनंजय मुंडे प्रकरणी तक्रारदार महिलेचा यू-टर्न?; “मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे, पण...”

googlenewsNext
ठळक मुद्देधनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानं त्यांचे राजकीय जीवन धोक्यात आलं होतंभाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने संपूर्ण घडामोडीला उलट कलाटणी मिळालीमी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही आणि हे लोक माझ्याविरोधात एकत्र आलेत

मुंबई – बलात्कार प्रकरणात अडचणीत सापडलेल्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना तुर्तास राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी, त्यानंतर बघू अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत घेतली आहे. रात्री उशीरा पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप ब्लॅकमेलिंग असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर खुलासाही धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरून केला आहे.

या संपूर्ण घटनेत पोलीस सहकार्य करत नाही असा आरोप तक्रारदार महिलेच्या वकिलांनी केला होता, धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानं त्यांचे राजकीय जीवन धोक्यात आलं होतं, परंतु भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने संपूर्ण घडामोडीला उलट कलाटणी मिळाली, कृष्णा हेगडे यांनी तक्रारदार मुलीवर गंभीर आरोप करत २०१० पासून ही महिला सतत माझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप केल्यानं धनंजय मुंडे यांच्याविरोधात असलेले वातावरण त्यांच्या बाजूने वळलं.

मात्र कृष्णा हेगडे यांना पहिल्यांदा आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते, त्यांनीच माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, हेगडेंनी केलेले आरोप माझी प्रतिमा मलीन करत धनंजय मुंडे यांच्यावरील गुन्ह्यात अडथळा आणणारे आहेत, कृष्णा हेगडेंचे आरोप बोगस आहेत असा दावा तक्रारदार महिलेने केला, त्यापाठोपाठ आता पुन्हा या प्रकरणात महिलेने तुमची हीच इच्छा असेल तर मी माघार घेते असं ट्विट म्हटलं आहे.

तक्रारदार महिलेने ट्विटमध्ये म्हटलं की, एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी निर्णय घ्या, काहीही माहिती नसताना जे मला ओळखत नाहीत आणि जे ओळखतात ते चुकीचा आरोप करत आहेत. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा, मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे. जर मी चुकीची होती तर हे लोक आतापर्यंत पुढे का आले नाहीत? मी मागे हटली तरी मला माझ्यावर गर्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटीच अशी मुलगी आहे जी लढतेय. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही आणि हे लोक माझ्याविरोधात एकत्र आलेत, तुम्हाला जे हवं ते लिहा असं सांगत रेणु शर्माने देव तुमचं भलं करो असं ट्विटमध्ये लिहिलं आहे.

आयपीएस अधिकारी पवारांच्या भेटीला

गुरुवारी दिवसभर धनंजय मुंडे प्रकरण माध्यमात गाजत असताना विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली, या भेटीत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीवर भाजपा आमदार अतुळ भातखळकरांनी टीका करत पवारांसोबत चर्चा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.

कृष्णा हेगडेंना पहिल्यांदा कुठे भेटली? – रेणु शर्मा

"मी पोलिसांत तक्रार केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडूनच जाणीवपूर्वक माझ्यावर आरोप केले जाऊ लागले आहेत. मी कोणत्याही हनीट्रॅपचा भाग नव्हते. उलटपक्षी कृष्णा हेगडे यांनीच माझ्याशी बोलायला सुरुवात केली होती. ते मला आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटले होते, हेगडेंचे आरोप बोगस असल्याचं म्हटलं आहे. "कृष्णा हेगडे यांनी माझ्यावर केलेले आरोप हे खोटे आणि बिनबुडाचे आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं तक्रारदार महिलेने सांगितले आहे.

Web Title: Dhananjay Munde Rape Allegation: "I'll take back what you want, Renu Sharma Tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.