बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 10:11 IST2025-08-13T10:10:58+5:302025-08-13T10:11:18+5:30
कर्नाटकची राजधानी, आयटी हब असलेल्या बंगळुरूमध्ये बालपणीच्या मित्राची बायको आवडली, त्यातून प्रेमाचा त्रिकोण तयार झाला आणि मित्रानेच मित्राला संपविल्याची घटना घडली आहे.

बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
आजकाल प्रेमसंबंध, अनैतिक संबंध वाढत चालले आहेत. यामुळे कोणीही कोणाचा काटा काढू लागला आहे. राजा रघुवंशीची पत्नी सोनम असेल किंवा मीरतची पतीला ड्रममध्ये सिमेंट टाकून गाडल्याची घटना असेल. या लफड्यांचे परिणाम भयानक होत चालले आहेत. कर्नाटकची राजधानी, आयटी हब असलेल्या बंगळुरूमध्ये बालपणीच्या मित्राची बायको आवडली, त्यातून प्रेमाचा त्रिकोण तयार झाला आणि मित्रानेच मित्राला संपविल्याची घटना घडली आहे.
बंगळुरूमध्ये एका घरात विजयकुमार नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. त्याच्या हत्येचा आरोप त्याच्या बालपणापासूनच्या मित्रावर लागला आहे. पोलिसांना तपासात लव्ह ट्रँगल सापडला आहे. धनंजय हा विजयचा लहानपणीपासूनचा मित्र होता. बेंगळुरुमध्येच हे दोघे लहानाचे मोठे झाले होते. विजय हा रिअल इस्टेट एजंट होता. त्याने १० वर्षांपूर्वीच आशा नावाच्या तरुणीसोबत लग्न केले होते.
आशाचे धनंजयसोबत लफडे सुरु असल्याचे विजयला नुकतेच समजले होते. त्याने त्यांना रंगेहाथ पकडले होते, तसेच त्यांचे त्या अवस्थेतील अनेक फोटो देखील पाहिले. तरी देखील विजयने आशाला एक संधी देण्याचा निर्णय घेतला होता. विजयने यासाठी घर बदलले, धनंजयपासून थोडे दूर तो रहायला गेला. असे केल्याने पत्नीचे आणि लंगोटी मित्राचे लफडे थांबेल असे त्याला वाटले होते. परंतू, अखेर विजयचा मृतदेह त्या नव्या भाड्याच्या घरात सापडला आहे.
पोलिसांनी आशाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु केली आहे, तर धनंजय फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.