Gurmeet Ram Rahim acquitted in journalist murder case: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानेपत्रकार छत्रपती हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. सीबीआय न्यायालयाच्या निर्णयात अंशतः बदल करत उच्च न्यायालयाने राम रहीमला संशयाचा फायदा दिला. या प्रकरणातील इतर तीन दोषी कुलदीप, निर्मल आणि किशन लाल यांची मात्र जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. आरोपींनी केलेल्या याचिकेनंतर झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला.
पंचकुला सीबीआय न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी या प्रकरणातील इतर तीन दोषी कुलदीप, निर्मल आणि किशन लाल यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. तर डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला दोषी मानले गेले होते. सुनावणी दरम्यान पुरेसे साक्षी-पुरावे नसल्याने, विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर आधीच्या निर्णयात अंशतः बदल करत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने पत्रकार हत्या प्रकरणातून गुरमीत राम रहीमला निर्दोष मुक्त केले.
या प्रकरणाशी संबंधित पुरावे आणि युक्तिवादांचा तपशीलवार विचार केल्यानंतर न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांना संशयाचा फायदा दिला आणि त्यांच्यावरील आरोप पुरेसे सिद्ध झाले नसल्याच्या आधारावर त्यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले.
राम रहीम तुरुंगातच राहणार
२०१९ मध्ये सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या २००२च्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जवळजवळ सात वर्षांनंतर, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम यांना त्याच प्रकरणात महत्त्वपूर्ण दिलासा दिला. तथापि, इतर प्रलंबित प्रकरणांमुळे राम रहीम तुरुंगातच राहणार आहे.
उच्च न्यायालयाने निर्णयाविरुद्ध धाव घेतली
या प्रकरणातील २०१९च्या निकालाविरुद्ध गुरमीत राम रहीमने अपील दाखल केले होते, ज्यामध्ये आज न्यायालयाने त्याला निर्दोष सोडले. गुरमीत राम रहीम दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत आहे. तो सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आहे. तथापि, तो वेळोवेळी पॅरोलवर सुटतो.
Web Summary : High Court acquitted Gurmeet Ram Rahim in the journalist murder case due to lack of evidence, overturning a CBI court ruling. However, he remains jailed due to other pending cases, including a rape conviction. Three other convicts' life sentences were upheld.
Web Summary : उच्च न्यायालय ने पत्रकार हत्याकांड में गुरमीत राम रहीम को सबूतों के अभाव में बरी कर दिया, सीबीआई अदालत के फैसले को पलट दिया। फिर भी, वह बलात्कार के आरोप सहित अन्य लंबित मामलों के कारण जेल में ही रहेगा। तीन अन्य दोषियों की आजीवन कारावास की सजा बरकरार रखी गई।