विवाहित गर्लफ्रेंडकडून पैसे, दागिन्यांची मागणी; वैतागलेल्या प्रियकराने तिलाच संपवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 08:13 AM2021-09-12T08:13:52+5:302021-09-12T08:15:10+5:30

Mathura Murder Case: महिला कानाच्या औषधासाठी आपल्या बहीणीच्या सासरी आली होती. 9 सप्टेंबरला तीचा मृतदेह एका शेतात सापडला.

Demand for money, jewelry from married girlfriends; Boyfriend murdered her | विवाहित गर्लफ्रेंडकडून पैसे, दागिन्यांची मागणी; वैतागलेल्या प्रियकराने तिलाच संपवले

विवाहित गर्लफ्रेंडकडून पैसे, दागिन्यांची मागणी; वैतागलेल्या प्रियकराने तिलाच संपवले

Next

मथुरा : जमालपूर गावात तीन दिवसांपूर्वी एका शेतामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पैसे आणि दागिन्यांच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या प्रियकरानेच विवाहित प्रेयसीचा काटा काढला. तिची गोळी झाडून हत्या केली आणि फरार झाला. (boyfriend murdered Married girlfrind in Mathura.)

पोलिसांनी त्या प्रियकराला अटक करून त्याने गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त केले आहे. अधिक माहितीनुसार ही महिला कानाच्या औषधासाठी आपल्या बहीणीच्या सासरी आली होती. 9 सप्टेंबरला तीचा मृतदेह एका शेतात सापडला. शनिवारी महिलेच्या हत्येचा खुलासा करताना एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर यांनी सांगितले की, 8 सप्टेंबरला नीरज तिची बहीणीकडे आली होती. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला. घटनास्थळावरून महिलेचा मोबाईल गायब होता. तपासावेळी तिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले.

पोलिसांनी तिचा प्रियकर रंजीतला ताब्यात घेतले. चौकशीवेळी तिच्या हत्येचे कारण समोर आले. नीरजसोबत त्याचे गेल्या 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. नीरज त्याच्याकडून पैसे आणि दागिने मागत होती. ही तिची मागणी पूर्ण करण्याच्या नादात तो कर्जात बुडाला होता. आरोपीकडून पोलिसांनी महिलेचा मोबाईल, पिस्तूल, एक खोका काडतूस आणि एक बाईक जप्त केली. 
 

Web Title: Demand for money, jewelry from married girlfriends; Boyfriend murdered her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.