UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:11 IST2025-10-28T11:10:22+5:302025-10-28T11:11:36+5:30
यूपीएससी कँडिडेट रामकेश मीनाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
दिल्लीच्या तिमारपूर भागात घडलेल्या यूपीएससी कँडिडेट रामकेश मीनाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. रामकेश मीनाचा मृतदेह ज्या घरात सापडला त्या घराची झडती घेतली असता पोलिसांना एक हार्ड ड्राइव्ह सापडली, ज्याची तपासणी करण्यात आली. या हार्ड ड्राइव्हमध्ये जवळपास १५ महिलांचे अश्लील व्हिडीओ सापडले. पोलिसांनी आता ही हार्ड ड्राइव्ह फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहे.
हत्येप्रकरणी आरोपी आणि रामकेशची लिव्ह-इन पार्टनर अमृता सिंग चौहान हिने चौकशीदरम्यान असंही सांगितलं की, रामकेशकडे तिचे खासगी फोटो आणि व्हिडीओ होते, जे तिच्या परवानगीशिवाय काढले गेले होते. अमृताने दावा केला की रामकेशने तिचं ऐकलं नाही. व्हिडीओ डिलीट करण्यास नकार दिला, ज्यामुळे अमृताने त्याची हत्या करण्याचा मोठा निर्णय घेतला.
हार्ड ड्राइव्हमधून जप्त केलेले व्हिडीओ महिलांच्या संमतीने बनवले आहेत की नाही याचा तपास दिल्ली पोलीस आता करत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अमृताने आपला एक्स बॉयफ्रेंड आणि मित्राच्या मदतीने यूपीएससीची तयारी करणाऱ्या रामकेश मीनाची हत्या केली आणि आग लावून ही दुर्घटना असल्याचं दाखवलं.
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
१८ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अमृताला मुरादाबाद येथून अटक केली. चौकशीदरम्यान, तिने तिच्या दोन मित्रांसह हत्येचे नियोजन केल्याची कबुली दिली. अमृताने सांगितलं की, रामकेश तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता आणि तिचे काही खासगी व्हिडीओ आणि फोटो हार्ड डिस्कवर सेव्ह केले होते. अमृताने जेव्हा त्याला ते डिलीट करण्यास सांगितले तेव्हा रामकेशने नकार दिला. संतापलेल्या अमृताने तिचा एक्स बॉयफ्रेंड सुमितला सांगितलं आणि भयंकर कट रचला.