Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:34 IST2025-10-01T15:34:02+5:302025-10-01T15:34:48+5:30
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबा चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थ सारथीबद्दल धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

फोटो - आजतक
दिल्लीपोलिसांचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसं स्वयंघोषित बाबा चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थ सारथीबद्दल धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. अटक करण्यात आलेला चैतन्यनंद पोलिसांना सहकार्य करत नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दिल्ली पोलीस चैतन्यनंदला घेऊन संस्थेत पोहोचले. त्याच्यासोबत त्याच्या महिला साथीदाराचीही चौकशी केली जाईल.
चैतन्यनंदच्या मोबाईलवर अनेक मुलींशी अश्लील चॅट्स आढळल्यानंतर तपास अधिक तीव्र झाला आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, स्वयंघोषित बाबाने त्यांच्या अय्याशीसाठी संस्थेत एक आलिशान, लग्झरी रुम बांधली होती. चॅटमध्ये तो दुबईच्या शेखसाठी पार्टनर शोधण्याबद्दल बोलत होता. आता, पोलीस चैतन्यनंदसमोर संस्थेतील काही लोकांचे जबाब नोंदवू शकतात.
डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
"मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्यनंदच्या मोबाईलवर अनेक मुलींसोबतचे आक्षेपार्ह आणि अश्लील चॅट्स आढळले आहेत. या चॅट्सवरून स्पष्टपणे दिसून येतं की, तो मुलींना अमिष दाखवून फसवत होता, त्यांच्या भावनांशी खेळत होता. तसेच त्याने एअर होस्टेससह अनेक महिलांसोबत फोटो काढले होते आणि त्यांच्या डीपीचे स्क्रीनशॉट त्याच्या फोनमध्ये सेव्ह केले होते.
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
चौकशीदरम्यान, दिल्ली पोलिसांनी चैतन्यनंदच्या दोन महिला सहकाऱ्यांनाही ताब्यात घेतलं. या महिला देखील त्याच्या कारवायांमध्ये सहभागी होत्या. त्या पोलिसांना महत्त्वाची माहिती देऊ शकतात. चौकशीदरम्यान स्वयंघोषित बाबा सातत्याने चुकीची उत्तरं देत आहे आणि खोटे बोलत आहेत, पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.