दिल्ली पुन्हा हादरली; प्रेयसीवर केले २० वार, डोकेही ठेचले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 10:02 AM2023-05-30T10:02:00+5:302023-05-30T10:02:16+5:30

आरोपीला केली अटक

Delhi shook again 20 times stabbed on the girlfriend her head was also crushed crime news | दिल्ली पुन्हा हादरली; प्रेयसीवर केले २० वार, डोकेही ठेचले

दिल्ली पुन्हा हादरली; प्रेयसीवर केले २० वार, डोकेही ठेचले

googlenewsNext

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये प्रियकराने आपल्या अल्पवयीन प्रेयसीवर चाकूने २० वेळा वार केले व तिचे डोके दगडाने ठेचून हत्या केली. या भीषण प्रकारामुळे दिल्ली हादरली आहे. १६ वर्षे वयाच्या या मुलीची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव साहिल (वय वर्षे २०) असे आहे. 

मुलगी रविवारी संध्याकाळी ती वाढदिवस समारंभाला जात असताना साहिलने वाटेत तिला अडविले. तिच्यावर त्याने चाकूने वार केले. त्यानंतर तिचे डोके दगडाने ठेचून हत्या केली, लाथाही मारल्या. या भीषण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हत्या केल्यानंतर साहिलने उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे पलायन केले होते. त्याला तिथून पोलिसांनी अटक केली आहे. साहिल एसी मेकॅनिक आहे. त्याने ही हत्या का केली याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र साहिल व त्याच्या प्रेयसीमध्ये शनिवारी भांडण झाले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाले आहे.

‘जबाबदारी नायब राज्यपालांची’
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या होते ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही. दिल्लीत कायदा, सुव्यवस्था राखणे हे नायब राज्यपालांची जबाबदारी आहे. त्यांनी ती योग्यरीतीने पार पाडली पाहिजे. या हत्येने अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या कारभारावर टीका केली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये पोलिसांचा कोणालाही धाक उरलेला नाही.

Web Title: Delhi shook again 20 times stabbed on the girlfriend her head was also crushed crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.