Delhi Police raid online sex racket when searching of missing girl | हरवलेल्या मुलीला शोधता शोधता पोलिसांनी उध्वस्त केले ऑनलाईन सेक्स रॅकेट 

हरवलेल्या मुलीला शोधता शोधता पोलिसांनी उध्वस्त केले ऑनलाईन सेक्स रॅकेट 

ठळक मुद्दे जवळपास २० मुलींना जबरदस्तीने येथे राहण्यास असून आक्षेपार्ह व्हिडीओ बनविण्यास सांगतात. एका रात्रीत २० ते २५ कॉल केले जात होते असून बहुतांश हे आंतरराष्ट्रीय असत. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक ग्राहकांना व्हिडीओ कॉल लावून अश्लील आणि आक्षेपार्ह हालचाली करून दाखविण्यास सांगितले जात असे.

नवी दिल्ली - उत्तरपूर्व दिल्लीतील नंद नगरी येथे सुरु असलेले ऑनलाईन सेक्स रॅकेटपोलिसांनी दिल्ली महिला आयोगाच्या मदतीने उध्वस्त केले आहे. या सेक्स रॅकेटमध्ये महिला, तरुणी आणि अल्पवयीन मुलींना पैशाचे आमिष दाखवून आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक ग्राहकांना व्हिडीओ कॉल लावून अश्लील आणि आक्षेपार्ह हालचाली करून दाखविण्यास सांगितले जात असे. बुधवारी दिल्ली पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी एक अल्पवयीन मुलगी आणि महिलेची सुटका करण्यात आली. हे रॅकेट चालविणाऱ्या दुकलीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

दिल्ली महिला आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १४ ऑगस्ट रोजी एका महिलेचा तिची मुलगी कृष्णा नगर परिसरातील घरातून हरविल्याबाबत तक्रार आयोगाला प्राप्त झाली होती. त्यांनतर आयोगाचे पथक महिलेच्या घरी गेले आणि त्यांना पोलिसात मुलगी हरविल्याबाबत तक्रार देण्यास सांगितली. बुधवारी हरविलेल्या मुलीच्या बहिणीने आयोगाला माहिती दिली की, तिची हरवलेली बहीण ही नंद नगरीमध्ये सुरु असलेल्या एका ऑनलाईन सेक्स रॅकेटमध्ये सामील झाली आहे. जवळपास २० मुलींना जबरदस्तीने येथे राहण्यास असून आक्षेपार्ह व्हिडीओ बनविण्यास सांगतात. नंतर तिने सांगितले की, ती देखील काही दिवसांपूर्वी या रॅकेटचा बळी पडली होती. मात्र, माझी त्यातून कशीतरी सुटका झाली. आम्हाला बळजबरीने रात्री १० ते सकाळी ६ वाजण्याच्यादरम्यान सोशल मीडियावरून ग्राहकांनी व्हिडीओ कॉल करायला सांगत असत अशी माहिती हरवलेल्या मुलीच्या बहिणीने दिली. 

त्यानुसार बुधवारी रात्री ९ वाजता ज्या ठिकाणी हे सेक्स रॅकेट चालविले होते त्याठिकाणी पोलीस आणि आयोगाच्या मंडळींनी धाड घातली. त्यावेळी त्यांना इमारतीच्या टेरेसवर एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि ३० वर्षीय महिला लपवून ठेवल्याचे आढळून आले, अशी माहिती दिल्ली महिला आयोगाने दिली. घराचा मालक आणि दोन नातेवाईकांना घटनास्थळाहून अटक करण्यात आली. लपलेल्या अल्पवयीन मुलीची आणि महिलेची पोलिसांनी सुटका केली. मात्र, १५ वर्षीय मुलीने माझे वकील रस्त्यावर बसून वस्तू विक्री करणारे असून येथे जास्त पैसे मिळतात म्हणून मी आले. मात्र, मला बळजबरीने ह्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सेक्स रॅकेटमध्ये गुंतविण्यात आले. सुटका केलेली महिला ही २० दिवसांपूर्वी या रॅकेटमध्ये सामील झाली झाली होती. एका रात्रीत २० ते २५ कॉल केले जात होते असून बहुतांश हे आंतरराष्ट्रीय असत. हरवलेली मुलगी मात्र अद्याप सापडलेली नसून घटनस्थळाहून मोबाईल फोन्स. सिम कार्ड्स, आधार कार्ड्स, सेक्स टॉय, मेमरी कार्ड्स, पासपोर्ट आणि अंतर्वस्त्र पोलिसांनी हस्तगत केली आहेत. 

अद्याप २० वर्षीय मुलगी हरवलेली असून दिल्ली पोलिसांनी तिचा लवकरात लवकर शोध घ्यावा आणि अटक केलेल्या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा केली पाहिजे अशी प्रक्रिया दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल यांनी दिली. 

Web Title: Delhi Police raid online sex racket when searching of missing girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.