शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

बलात्कार प्रकरणी राजस्थानच्या मंत्र्याच्या मुलाला अटक करण्यासाठी दिल्ली पोलीस जयपूरमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 4:41 PM

Delhi police in Jaipur to arrest Rajasthan minister's son over rape case : त्यानंतर दिल्ली पोलिसांनी रोहित जोशीला 18 मे पर्यंत त्यांच्यासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले. अधिकाऱ्यांनी समन्सची प्रत त्याच्या घराच्या भिंतीवर चिकटवली.

राजस्थानचे मंत्री महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी याच्याविरोधात एका २३ वर्षीय महिलेने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपाप्रकरणी दिल्लीपोलिसांचे पथक रविवारी जयपूरला पोहोचले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "फरार असलेल्या जोशीला पकडण्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांचे पथक जयपूरला पोहोचले आहे. त्याला शोधण्यासाठी आमचे पथक कार्यरत आहे."पोलिसांच्या पथकाने मंत्र्यांच्या शहरातील दोन निवासस्थानांना भेट दिली. त्यांचा मुलगा मात्र सापडला नाही. "आमची टीम फरार असलेल्या रोहित जोशीचा शोध घेत आहेत," असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.  त्यानंतर दिल्ली पोलिसांनी रोहित जोशीला 18 मे पर्यंत त्यांच्यासमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले. अधिकाऱ्यांनी समन्सची प्रत त्याच्या घराच्या भिंतीवर चिकटवली.

राजस्थानचे मंत्री आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे महेश जोशी यांचा मुलगा रोहित जोशी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. रोहित जोशीच्या शोधात दिल्ली पोलिसांचे एक पथक राजस्थानच्या जयपूरला पोहोचले आहे. राजस्थान सरकारच्या मंत्र्यानेही या प्रकरणाची मीडिया ट्रायल योग्य नसल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे 15 पोलिसांचे पथक जयपूरला पोहोचले आहे.रोहित जोशीविरुद्ध दिल्लीतील सदर बाजार पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. दिल्ली पोलिसांचे पथक तीन वाहनांतून जयपूरला पोहोचले आहे. दिल्ली पोलिसांचे पथक बलात्कार आरोपी रोहित जोशीलाही अटक करू शकते, असे बोलले जात होते. मात्र पोलिसांना रोहितचा शोध घेता आला नाही. सदर बाजार पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात दिल्ली पोलिसांचे पथक रोहित जोशीचा शोध घेत आहे. दिल्लीतील सदर बाजार पोलिस ठाण्यात एका तरुणीने रोहित जोशीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. पीडितेने रोहितवर मारहाण, ब्लॅकमेल आणि गर्भपाताचा आरोपही केला आहे.पीडितेने बलात्काराचा आरोप केला होतापीडितेने दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये ही माहिती दिली होती की, ती 2020 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहित जोशीच्या संपर्कात आली होती. आरोपानुसार, 2021 मध्ये रोहितने मुलीला सवाई माधोपूर येथे नेले आणि ड्रिंकमध्ये नशा मिसळून तिला प्यायला दिले. यानंतर रोहितने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा व्हिडिओ बनवला, फोटो काढले. हे व्हिडीओ आणि फोटोने तिला ब्लॅकमेल करून रोहितने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिसdelhiदिल्ली