Delhi Video: विना हेल्मेट ट्रिपल सीट जाताना अडवले, दोन तरुणी आणि एका तरुणाची पोलिसाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 17:21 IST2022-06-08T17:20:36+5:302022-06-08T17:21:16+5:30

Delhi Girl Viral Video: चुकीच्या दिशेने विना हेल्मेट ट्रिपल सीट जात असलेल्या तरुण आणि तरुणींना अडवणाऱ्या पोलिसाला भररस्त्यात मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

Delhi news: man and two girls misbehaved with and manhandled Police and Traffic Police personnel in delhi | Delhi Video: विना हेल्मेट ट्रिपल सीट जाताना अडवले, दोन तरुणी आणि एका तरुणाची पोलिसाला मारहाण

Delhi Video: विना हेल्मेट ट्रिपल सीट जाताना अडवले, दोन तरुणी आणि एका तरुणाची पोलिसाला मारहाण

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील देवली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहतूक निरीक्षकाला एक तरुण आणि दोन तरुणींनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना सकाळी 10.00 वाजेच्या सूमारास घडली. या घटनेचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला असून, तो सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत आहे. 

वाहतूक पोलिसाला मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, आज(बुधवार) सकाळी 10 वाजता एक तरुण आणि दोन तरुणी एकाच स्कुटीवरुन चुकीच्या दिशेने येत होते. यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाने त्यांना रोखले. आरोपींच्या गाडीला नंबर प्लेटही नव्हती. पोलिसाने अडवल्यामुळे आरोपींना राग अनावर झाला आणि त्यांनी पोलिसासोबत हुज्जत घातली. वाहतूक पोलिसांनी त्यांना स्कूटी हटवण्यास सांगितल्यावर तरुणी अडून बसली आणि तिने पोलिसाला मारहाण करण्यास सुरुवात केली. 

आरोपींवर गुन्हा दाखल केला
यावेळी इतर वाहतूक पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने प्रकरण शांत झाले. याप्रकरणी पोलीस कारवाई करत आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याची रुग्णालयात तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Delhi news: man and two girls misbehaved with and manhandled Police and Traffic Police personnel in delhi