मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 14:04 IST2025-10-27T14:02:42+5:302025-10-27T14:04:25+5:30
काही आठवड्यांपूर्वी लागलेल्या आगीमागचं गूढ उलगडल्यानंतर पोलिसांना मोठा धक्का बसला आहे.

फोटो - ndtv.in
दिल्लीतील गांधी विहारमध्ये काही आठवड्यांपूर्वी लागलेल्या आगीमागचं गूढ उकलल्यानंतर पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. एका तरुणीने आपला एक्स बॉयफ्रेंड आणि मित्राच्या मदतीने यूपीएससीची तयारी करणाऱ्या रामकेश मीनाची हत्या केली आणि आग लावून ही दुर्घटना असल्याचं दाखवलं. असा भयंकर कट रचला. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी दिल्लीपोलिसांना गांधी विहारमधील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली.
अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, परंतु आतील दृश्य धक्कादायक होते. तिथे एक जळालेला मृतदेह पडला होता. तो ३२ वर्षीय रामकेश मीनाचा असल्याचं समोर आलं, जो तिथेच राहून यूपीएससीची तयारी करत होता. सुरुवातीला गॅस लीकमुळे ही दुर्घटना घडल्याचं मानलं जात होतं, परंतु मृतदेहाची स्थिती आणि खोलीत विखुरलेल्या वस्तूंमुळे पोलिसांना संशय निर्माण झाला.
घटनेनंतर जेव्हा गुन्हे पथक आणि एफएसएल पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा संपूर्ण प्रकरण उलगडण्यास सुरुवात झाली. ५ आणि ६ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे २:२० वाजता दोन जण चेहरा झाकून इमारतीत शिरले आणि त्यानंतर फक्त एकच बाहेर आला. २:५७ वाजता अमृता चौहान इमारतीतून बाहेर पडताना दिसली. काही मिनिटांनंतर आग लागली. पोलिसांनी अमृताचा मोबाइल डेटा आणि कॉल रेकॉर्ड चेक केले. लोकेशनही तिथलंच होतं.
१८ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अमृताला मुरादाबाद येथून अटक केली. चौकशीदरम्यान, तिने तिच्या दोन मित्रांसह हत्येचे नियोजन केल्याची कबुली दिली. अमृताने सांगितलं की, रामकेश तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता आणि तिचे काही खासगी व्हिडीओ आणि फोटो हार्ड डिस्कवर सेव्ह केले होते. अमृताने जेव्हा त्याला ते डिलीट करण्यास सांगितले तेव्हा रामकेशने नकार दिला. संतापलेल्या अमृताने तिचा एक्स बॉयफ्रेंड सुमितला सांगितलं आणि भयंकर कट रचला.
फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी असल्याने अमृताला पुरावे कसे नष्ट करायचे हे माहित होते. ५-६ ऑक्टोबरच्या रात्री ते तिघे गांधी विहार येथे आले. त्यांनी प्रथम रामकेशचा गळा दाबला, नंतर काठीने त्याला मारहाण केली. आग लवकर पसरावी म्हणून त्यांनी शरीरावर तूप, तेल आणि वाइन ओतली. सुमितने सिलेंडरचा नॉब उघडला, गॅस पसरवला आणि आग लावली. क्राइम सीरीज पाहून तिने हा भयंकर कट रचला.
मृताने दरवाजाची ग्रिल काढून आतून गेट लॉक केला जेणेकरून ती दुर्घटना असल्याचं भासेल. एलपीजी सिलिंडर वितरक सुमित कश्यपला गॅस सिलेंडरचा स्फोट कधी आणि कसा होईल हे माहित होतं. त्याने सिलिंडरचा नॉब उघडला, तो मृतदेहाजवळ ठेवला, तो पेटवला आणि निघून गेला. सुमारे एक तासानंतर, एक स्फोट झाला आणि सर्व जळून खाक झालं. सत्य समोर आल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.