गर्लफ्रेन्डसोबतचा व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी, मित्रानेच मागितले १० लाख रूपये आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 02:16 PM2021-09-25T14:16:23+5:302021-09-25T14:18:25+5:30

रात्री साधारण १२ वाजता एक व्यक्ती लाल रंगाच्या गाडीत तिथे पोहोचला. त्याने आधी आजूबाजूला पाहिला आणि कुणी दिसलं नाही तर खाली उतरून त्याने बॅग उचलली.

Delhi : Friend blackmail fear of girl friend video viral accused arrested | गर्लफ्रेन्डसोबतचा व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी, मित्रानेच मागितले १० लाख रूपये आणि मग...

गर्लफ्रेन्डसोबतचा व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी, मित्रानेच मागितले १० लाख रूपये आणि मग...

Next

आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दाखवत एका व्यक्तीने आपल्याच मित्राला ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन केला. यासाठी आरोपी मित्राने आपल्या मित्राच्या घरी एक लिफाफा आणि त्यात एक पेन ड्राइव्ह पोस्ट केला होता. तसेच मेसेजमद्ये लिहिले होते की, जर त्याने पूर्वी दिल्लीतील सांगितलेल्या ठिकाणी १० लाख रूपये नाही पाठवले तर तो हा व्हिडीओ व्हायरल करेल. पीडित व्यक्ती लगेच सीआर पार्क पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्याने पोलिसांकडे लिखित तक्रार दिली. 

पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून सीआर पार्क पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. तसेच ५ टीम बनवून आरोपीच्या शोधास पाठवल्या. लिफाफ्यात एक पेपर होता, ज्यावर लिहिलं होतं की, लक्ष्मी नगर फ्लायओव्हरमध्ये लाल रंगाच्या बॅगमध्ये १० लाख रूपये फ्लायओव्हरखाली ठेवायचे आहेत. (हे पण वाचा : सारखं मोबाईल घेऊ नकोस, आई ओरडली; १० वीच्या मुलीनं अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं)

पोलिसांना रचला सापडा

त्यानंतर पोलिसांनी ठीक तसंच केलं जसं आरोपीने लिहिलं होतं. पीडितने एका लाल बॅंगमध्ये काही कपडे आणि काही इतर वस्तू भरल्या. ठरलेल्या वेळेवर पोलिसांनी त्याला ती बॅग फ्लायओव्हर खाली ठेवण्यास सांगितली. पोलिसांनी आजूबाजूच्या भागात आधीच ट्रॅप लावला होता.

यानंतर रात्री साधारण १२ वाजता एक व्यक्ती लाल रंगाच्या गाडीत तिथे पोहोचला. त्याने आधी आजूबाजूला पाहिला आणि कुणी दिसलं नाही तर खाली उतरून त्याने बॅग उचलली. जसा बॅग घेऊन तो तेथून जात होता पोलिसांनी त्याला धरलं. पकडण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव समीर आहे आणि तो गुरूग्राममधील एक कंपनीत काम करतो.

लॅपटॉपमधून कॉपी केला होता व्हिडीओ

पीडितनेही समीरला लगेच ओळखलं. कारण दोघेही गेल्या सात - आठ वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. चौकशी दरम्यान आरोपीने सांगितलं की, एकदा तो पीडितसोबत जीके-२ एम ब्लॉकमधील एका कॅफेमध्ये बसला होता. त्यावेळी पीडितचा लॅपटॉप  त्याच्याकडून ऑनच राहिला होता. संधी पाहून त्याने पीडितचा डेटा एका पेन ड्राइव्हमध्ये कॉपी केला होता. 

आरोप आहे की, या दरम्यान त्या व्हिडीओही कॉपी झाला. ज्यात पीडित आणि त्याची गर्लफ्रेन्ड होती. याचा व्हिडीओचा फायदा घेत आरोपीने आपल्या मित्राला ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन केला होता. चौकशी दरम्यान आरोपीने सांगितलं की, त्याला ऐशो-आरामाचं जीवन जगण्याची सवय लागली होती. त्यामुळे त्याच्यावर काही लोकांचं कर्जही होतं. जे तो फेडू शकत नव्हता. त्यानंतर त्याने हा मित्राला फसवण्याचा प्लॅन केला. 

Web Title: Delhi : Friend blackmail fear of girl friend video viral accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app