धक्कादायक! पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पत्नी, मुलाची केली हत्या; स्वत: पोलिसांना फोन केला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 11:14 IST2023-02-18T11:12:32+5:302023-02-18T11:14:05+5:30

देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने दोन हत्या केल्याचे समोर आले. अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नी आणि निष्पाप मुलाची चाकूने भोसकून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः पोलिसांना फोन केला.

delhi double murder case man killed wife and son by stabbing them with knife for suspected of extramarital affair | धक्कादायक! पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पत्नी, मुलाची केली हत्या; स्वत: पोलिसांना फोन केला अन्...

धक्कादायक! पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पत्नी, मुलाची केली हत्या; स्वत: पोलिसांना फोन केला अन्...

देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने दोन हत्या केल्याचे समोर आले. अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नी आणि निष्पाप मुलाची चाकूने भोसकून हत्या केली आणि त्यानंतर स्वतः पोलिसांना फोन केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उत्तर पश्चिम दिल्लीतील शकूरपूर भागात घडली.

ब्रिजेश असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून ब्रिजेशने पत्नी आणि मुलाची भोसकून हत्या केली. अंजली असे मृत पत्नीचे नाव आहे. मारेकऱ्याचा मुलगा हृतिक अवघा दीड वर्षांचा होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत ब्रिजेशला त्याच्या पत्नीशी अवैध संबंध असल्याचा संशय असल्याचे समोर आले. ब्रिजेशने याच रागात पत्नी आणि मुलाची हत्या केली.

नेपाळहून फरार झालेले भाऊ-बहीण पती-पत्नी बनून करत होते काम, आईला ओळखण्यास दिला नकार

ब्रिजेश आपल्या कुटुंबासह दिल्लीत राहतो, तो इलेट्रिकलचे काम करतो. आरोपीने हत्येसाठी घरातील चाकूचा वापर केला. हत्येनंतर ब्रिजेशने पोलिसांना फोन करून पत्नी आणि मुलाची हत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Web Title: delhi double murder case man killed wife and son by stabbing them with knife for suspected of extramarital affair