Delhi Crime: सिगरेटसाठी 10 रुपये न दिल्याने हत्या; चौघांनी 17 वर्षीय तरुणाला भररस्त्यात भोसकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 13:00 IST2022-06-08T13:00:04+5:302022-06-08T13:00:15+5:30
Delhi Crime: सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Delhi Crime: सिगरेटसाठी 10 रुपये न दिल्याने हत्या; चौघांनी 17 वर्षीय तरुणाला भररस्त्यात भोसकले
नवी दिल्ली:दिल्लीत सिगारेटसाठी 10 रुपये न दिल्याने एका अल्पवयीन मुलाची भरदिवसा भोसकून हत्या करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीतील आनंद पर्वत परिसरात सोमवारी ही घटना घडली आणि मंगळवारी मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांच्या डीसीपी (मध्य) श्वेता चौहान यांनी सांगितले की, रामजस शाळेजवळ मंगळवारी एक मृतदेह आढळून आला, ज्याच्या पोटावर चाकूने वार केल्याच्या खुणा होत्या. हा मृतदेह आनंद पर्वत येथील रहिवासी विजय याचा असल्याचे समजले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सिगारेटचे पैसे न देण्यावरून भांडण
चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, मृत अल्पवयीन मुलाने आरोपीला सिगारेटसाठी पैसे दिले नव्हते. यावरून वाद झाला, त्यानंतर ही घटना घडली. प्रवीण (20), जतीन (24), अजय (23) आणि सोनू (20) अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना कारागृहात पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे.
आरोपींमध्ये काही चालक तर काही मजूर आहेत
दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी प्रवीण हा मजूर म्हणून काम करतो, तर जतीन हा ड्रायव्हर आणि अजय सेल्समन म्हणून काम करतो. याशिवाय चौथा आरोपी सोनू टेलर मास्टर आहे. एप्रिलमध्ये मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातही अशीच घटना घडली होती. फुकटात सिगारेट न दिल्याने चार तरुणांनी दुकानदाराची हत्या केली होती.