Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 16:07 IST2025-11-09T16:05:57+5:302025-11-09T16:07:28+5:30
Students Shoot Classmate: ११वीमध्ये शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांनी वर्गमित्राला घरी बोलावलं आणि घरात त्याच्यावर गोळीबार केला. या मागील कारणही समोर आले आहे.

Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
Students Shoot Classmate Gurugram: ११वीमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यांवर दोन वर्गमित्रांनीच प्राणघातक हल्ला केला. विद्यार्थ्याला घरी बोलवलं. त्याला आणण्यासाठी एक विद्यार्थी त्याच्या घरी गेला होता. घरी आणल्यानंतर त्याच्यावर गोळी झाडण्यात आली, यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असून पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली असून, रविवारी उघडकीस आली. जी पिस्तुल वापरण्यात आली, त्याच्या वडिलांची परवाना असलेली आहे.
गुरुग्राम पोलिसांनी सांगितले की, जखमी विद्यार्थ्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणातील दोन्ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
फ्लॅटवर बोलवले, विद्यार्थ्यावर गोळीबार, कारण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील सेक्टर ४८ मध्ये असलेल्या सेंट्रल पार्क सिसॉर्टमध्ये ही घटना घडली. शनिवारी रात्री विद्यार्थ्याने १७ वर्षीय जखमी विद्यार्थ्याला वडिलांनी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटवर बोलावून घेतले.
विद्यार्थ्याने वर्गमित्रावर गोळीबार जुन्या वादातून केल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. दोघांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला होता. या घटनेतील तीनही विद्यार्थी सोसायटीजवळच असलेल्या यदुवंशी शाळेत शिकतात. त्यांच्या वाद झाला होता.
विद्यार्थ्याने भेटायला नकार दिला, तो घ्यायला घरी आला
जखमी विद्यार्थ्याच्या आईने सरदार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, ज्याच्या वडिलांचे पिस्तुल गोळीबारासाठी वापरण्यात आले, त्या विद्यार्थ्याने माझ्या मुलाला कॉल करून भेटायला बोलावले होते. माझ्या मुलाने भेटायला नकार दिला. पण, त्याने खूपच आग्रह केला. त्यानंतर आरोपी माझ्या मुलाला घ्यायला घरीही आला होता.
दुसरा विद्यार्थी फ्लॅटवरच थांबलेला
आरोपी विद्यार्थ्याचा मित्र फ्लॅटमध्ये थांबलेला होता. हल्ला करण्यात आलेला विद्यार्थी जेव्हा फ्लॅटवर दिसला तेव्हा त्याला तो दिसला. त्यानंतर मुख्य आरोपी असलेल्या मुलाने वडिलांचे परवाना असलेले पिस्तुल घेतले आणि गोळी झाडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस फ्लॅटवर पोहोचले. पोलिसांनी पिस्तुल जप्त केले. पाच जिवंत काडतुसे, एक रिकामे काडतुस आणि आणखी ६५ जिवंत काडतुसेही घरात आढळून आली. सगळी पोलिसांनी ताब्यात घेतले. मुलाला मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले.