दिल्लीपोलिसांच्या क्राईम ब्रँचने जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. द्वारका येथील बामनौली गावात टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी मुदत संपलेली (एक्स्पायर्ड) बिस्किटं, खाद्यपदार्थ आणि सॉफ्ट ड्रिंक्सवर नवीन तारखा छापून पुन्हा बाजारात विक्री करत होते.
तपासात असा धक्कादायक खुलासा झाला आहे की, हे आरोपी बाजारातून मुदत संपलेले किंवा मुदत संपत आलेले पदार्थ अगदी कवडीमोल भावात खरेदी करत असत. त्यानंतर, 'थिनर' सारख्या केमिकल्सचा वापर करून पॅकेटवरील मूळ मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्स्पायरी डेट अतिशय काळजीपूर्वक पुसून टाकली जात असे.
कोडिंग आणि प्रिंटिंग मशीन जप्त
क्राईम ब्रँचने घटनास्थळावरून एक विशेष कोडिंग आणि प्रिंटिंग मशीनही जप्त केली आहे, ज्याचा वापर पॅकेटवर नवीन आणि बनावट तारखा छापण्यासाठी केला जात होता. मुदत संपलेला खाण्यापिण्याचा माल नवीन तारीख लावून पुन्हा बाजारात विकला जात असे. मशीनच्या साहाय्याने नवीन बनावट तारीख छापल्यानंतर हे सामान नवीन पॅकिंगमध्ये भरून बाजारात पुरवलं जात होतं.
मोठ्या ब्रँडच्या कोल्ड ड्रिंक्सचे शेकडो कॅन जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून थम्स अप, स्प्राइट, लिम्का आणि कोका-कोला यांसारख्या मोठ्या ब्रँडच्या कोल्ड ड्रिंक्सचे शेकडो कॅन आणि डबे जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय, पॅकेजिंग बदललेली नामांकित कंपन्यांची बिस्किटंही मोठ्या प्रमाणात सापडली आहेत.
तिघांना अटक
क्राईम ब्रँचच्या पथकाने घटनास्थळावरून कोल्ड ड्रिंक्सचे अनेक कार्टन्स आणि बिस्किटांचे पुडे जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. क्राईम ब्रँचने मुख्य सूत्रधार आणि त्याच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. हे नेटवर्क नेमकं किती मोठं आहे आणि कोणत्या घाऊक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून हा माल बाजारात पोहोचवला जात होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
Web Summary : Delhi police busted a racket where expired food items like biscuits and cold drinks were re-labeled with new dates and sold. Three arrested. Expired goods were bought cheaply, dates erased, and new ones printed using special machines. Large quantities of branded drinks and biscuits seized.
Web Summary : दिल्ली पुलिस ने एक्सपायरी डेट बदलकर कोल्ड ड्रिंक्स और बिस्किट बेचने वाले रैकेट का पर्दाफाश किया। तीन गिरफ्तार। एक्सपायर्ड सामान सस्ते में खरीदा जाता था, तारीखें मिटाई जाती थीं, और विशेष मशीनों का उपयोग करके नई तारीखें छापी जाती थीं। ब्रांडेड पेय और बिस्कुट की बड़ी मात्रा जब्त।