शहरं
Join us  
Trending Stories
1
हाडे तुटली, आतड्या फाटल्या, अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचा भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर
2
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
3
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
4
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
5
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
6
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
7
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
8
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
9
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
10
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
11
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
12
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
13
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
14
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
15
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
16
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
17
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
20
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा

Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:13 IST

Delhi Blast : दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास एनआयए अधिक वेगाने करत आहे आणि आता याप्रकरणात मोठे खुलासे समोर येत आहेत.

दिल्लीस्फोट प्रकरणाचा तपास एनआयए अधिक वेगाने करत आहे आणि आता याप्रकरणात मोठे खुलासे समोर येत आहेत. हरियाणातील फरीदाबाद येथील डॉ. मुझम्मिल शकीलच्या दोन खोल्यांमधून २९०० किलो स्फोटकं जप्त करण्यात आली. यानंतर आता त्याच्या फोनची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. २६ जानेवारी आणि दिवाळीला लाल किल्ल्यावर स्फोट घडवण्याचा त्याचा प्लॅन होता. तसेच डॉ. मुझम्मिल आणि डॉ. उमर यांनी लाल किल्ल्याची रेकी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुझम्मिलच्या फोनमधील डंप डेटावरून २६ जानेवारी आणि दिवाळीला स्फोट घडवण्याचा प्लॅन असल्याची माहिती मिळाली आहे. तपास यंत्रणेच्या चौकशीत पुष्टी झाली की, या दोन महत्त्वाच्या दिवशी लाल किल्ल्याला टार्गेट करणं हा त्यांच्या प्लॅनचा भाग होता. जास्तीत जास्त गर्दी असेल अशी संधी शोधण्याचा त्यांचा हेतू होता. पण ते हल्ला करू शकले नाहीत.

हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू

दिल्ली बॉम्बस्फोटांचा संबंध केवळ फरिदाबादशीच नाही तर हरियाणातील मेवातशीही असल्याचं दिसून येत आहे. मौलवी इस्ताकला येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याला जम्मू आणि काश्मीरला नेण्यात आलं. एनआयए आणि जम्मू आणि काश्मीर पोलीस चौकशी करत आहेत.

वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट

मौलवी इस्ताकने त्याची खोली डॉ. मुझम्मिलला भाड्याने दिल्याची माहिती मिळत आहे. फरिदाबादच्या फतेहपूर टागा गावात या खोलीत २५०० किलोपेक्षा जास्त स्फोटकं आढळली. मुझम्मिलने दोन खोल्या भाड्याने घेतल्या होत्या, जिथे एकूण २९०० किलोपेक्षा जास्त स्फोटकं जप्त करण्यात आली. तपास संस्था, एनआयए, आता मौलवीची चौकशी करत आहे.

 देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा

राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये सोमवारी मोठा स्फोट झाला. मृतांचा आकडा वाढला आहे. मृतांची संख्या १२ झाली आहे आणि जखमींची संख्या २५ झाली आहे. कार स्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळपासच्या अनेक वाहनांची जळून राख झाली, ज्यामुळे रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, परिसर आगीने वेढला गेला आणि जखमी झालेले लोक मदतीसाठी ओरडत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi blast: Red Fort targeted on Republic Day, Diwali; plan foiled.

Web Summary : NIA investigation reveals a plot to bomb Delhi's Red Fort on Republic Day and Diwali. Explosives were seized, and a suspect, Dr. Muzammil, confessed to planning the attacks. The investigation links the blast to Faridabad and Mewat, with arrests made and further inquiries ongoing.
टॅग्स :delhiदिल्लीcarकारBlastस्फोटTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPoliceपोलिस