Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:46 IST2025-11-17T14:43:55+5:302025-11-17T14:46:23+5:30
Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटाच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटाच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. कानपूरचं दिल्लीस्फोट प्रकरणाशी असलेलं कनेक्शन आता समोर आलं आहे. एनआयएच्या तपासात असं दिसून आलं आहे की, डॉ. परवेझ (डॉ. शाहीनचा भाऊ), हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आरिफ आणि डॉ. फारूक अहमद दार हे स्फोटाच्या एक तास आधीपर्यंत डॉ. उमर (कार स्फोट घडवणारा) च्या संपर्कात होते. डॉ. शाहीन आणि डॉ. मुझम्मिल ८ नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत उमरच्या थेट संपर्कात होते. स्फोटाचं प्लॅनिंग २ ऑक्टोबरपासून सुरू झालं आणि २८ ऑक्टोबर रोजी ते अंतिम करण्यात आल्याचं देखील समोर आलं आहे.
लाल किल्ला स्फोट घडवण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईत नेपाळमधून खरेदी केलेले सात सेकंड-हँड मोबाईल वापरण्यात आले होते. एकूण १७ सिम कार्ड वापरण्यात आले होते, त्यापैकी सहा कानपूरमधून खरेदी करण्यात आले होते. यापैकी दोन सिमकार्ड बेकोनगंज आयडीने ओळखले गेले होते, ज्याच्या आधारे सुरक्षा एजन्सी कारवाई करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने डॉ. परवेझचा मेहुणा आणि बेकोनगंजमधील कपड्यांच्या दुकानाचा मालक उस्मान याची सहा तास चौकशी केली, परंतु अद्याप कोणतीही महत्त्वाची माहिती मिळालेली नाही.
दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
डॉ. परवेझ कानपूरला ये-जा करताना कर्नलगंज, जीएसव्हीएम मेडिकल कॉलेज, बाबूपुरवा आणि मंधाना येथील मित्रांना भेटला. ऑक्टोबरमध्ये डॉ. शाहीन कानपूरमध्ये दिसल्याचंही उघड झालं आहे. एनआयएने लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील एका आरोपीला दिल्ली न्यायालयात हजर केलं. आरोपी आमिर रशीद अलीला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर आमिरला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्फोटात वापरलेली आय२० कार आमिर रशीद अलीच्या नावावर नोंदणीकृत होती.
दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं , पण...
दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
आमिर हा व्यवसायाने प्लंबर आहे, परंतु लाल किल्ला बॉम्बस्फोटाच्या नियोजनात सहभागी असल्याचा आरोप आहे. १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोटकांनी भरलेल्या एका कारचा स्फोट झाला, ज्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात वापरलेली कार जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील डॉक्टर उमर नबी चालवत होता. उमर एका 'व्हाईट कॉलर' टेरर मॉड्यूलशी संबंधित होता ज्याचा प्रामुख्याने हरियाणाच्या फरीदाबाद येथून २,९०० किलोग्रॅम स्फोटकं सापडल्यानंतर पर्दाफाश करण्यात आला.