सोशल मीडियावर महिलेची बदनामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 00:34 IST2021-02-04T00:34:35+5:302021-02-04T00:34:54+5:30
Crime News : याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी संशयित आरोपी मामूद सेहराज अन्सारीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक ए.जी. टोम्पे हे अधिक तपास करत आहेत.

सोशल मीडियावर महिलेची बदनामी
माणगाव : एका विवाहित महिलेच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट उघडून त्यावर बदनामीकारक मजकूर आणि फोटो टाकून
तिची बदनामी करणाऱ्या संशयिताविरोधात गोरेगाव पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेचे लग्न झाले आहे. हे माहीत असूनदेखील संशयित आरोपी मामूद सेहराज अन्सारी (रा. भदोई, चोरीखास, जि. अलाहाबाद) हा पीडितेला २०१७ पासून आजपर्यंत वारंवार फोन करून भेटण्यासाठी बोलाऊन, तिच्याकडे पैशाची मागणी करीत असे. मामूद अन्सारी हा फेसबुकवर पीडितेच्या नावाने फेक अकाउंट तयार करून त्यावर बदनामीकारक मजकूर, तसेच पीडितेचे फोटो टाकून तिची बदनामी करीत होता. पीडितेने अन्सारी याला
याबाबत फोनवरून जाब विचारला असता, अन्सारीने पीडितेला धमकी दिली.
याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी संशयित आरोपी मामूद सेहराज अन्सारीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक ए.जी. टोम्पे हे अधिक तपास करत आहेत.