आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दीपक मानकर यांच्यासह दोघांना जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 09:35 PM2019-10-22T21:35:37+5:302019-10-22T21:36:13+5:30

मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जगताप यांनी दोन जून २०१८ साली घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती.

Deepak Mankar and two others granted bail | आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दीपक मानकर यांच्यासह दोघांना जामीन

आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दीपक मानकर यांच्यासह दोघांना जामीन

googlenewsNext
ठळक मुद्देमोक्कातून वगळण्याबाबत त्यांना मिळाला नाही दिलासा

पुणे : जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी उपमहापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यासह दोघांची उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. परंतु, मोक्कातून वगळण्याबाबत त्यांना दिलासा मिळाला नाही.
याप्रकरणी मानकर आणि सुधर यांनी याचिका दाखल केली होती. मानकर यांच्याकडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या जगताप यांनी दोन जून २०१८ साली घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मानकर, विनोद रमेश भोळे (वय ३४, रा. घोरपडी पेठ), सुधीर दत्तात्रेय सुतार (वय ३०, रा. कोथरूड), अमित उत्तम तनपुरे (वय २८, रा. मांडवी खुर्द), अतुल शांताराम पवार (वय ३६) आणि विशांत श्रीरंग कांबळे (वय ३०, रा शांतिनगर येरवडा), कुख्यात गुंड नाना कुदळे (रा. केळेवाडी) आणि अजय कंधारे यांना अटक झाली होती. तर बिल्डर सुधीर कर्नाटकी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात दोषारोपपत्र देखील दाखल आहे. मानकरांवर मोक्कानुसार कारवाई करण्याची परवानगी देताना त्यांच्यावर १४ ऐवजी आठच गुन्हे असल्याबाबतचा अहवाल दिल्याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त व सध्याचे मुंबई रेल्वे आयुक्त रवींद्र सेनगावकर यांची चौकशी करण्याचे आदेश नुकतेच विशेष मोक्का न्यायालयाने दिले होते.
सेक्शन २३ प्रमाणे मोक्कासाठी जी परवानगी दिली गेली त्यामध्ये आठ  गुन्हे होते. ते आठ गुन्हे  या टोळी विरोधात पकडले तर यामध्ये मोक्का लागत नसल्याचे नमूद केले होते. याप्रकरणात एकूण १४ गुन्हे होते. त्यातील आठ गुन्ह्यावरती पोलिसांनी मोक्का लागू केल्यानंतर १४ पैकी ८ गुन्हेच का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली होती. पोलिसांची चुक असेल तर तुम्हाला का फायदा मिळाला पाहिजे अशीही विचारणा बचाव पक्षाला करण्यात आली होती. त्यावर मोक्काचे कलम २ आणि ३ नुसार तीन पेक्षा जास्त शिक्षा असल्याचा गुन्हा लागतो. बाकीच्या गुन्ह्यात तीन वर्षापेक्षा कमी शिक्षा असल्याने त्यांच्यावर १४ पैकी आठच गुन्ह्यात मोक्का लावण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने याप्रकरणी जामीन दिला आहे.
- अ‍ॅड. प्रशांत पाटील, दिपक मानकर यांचे वकील.

Web Title: Deepak Mankar and two others granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.