शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

बंद घरात दोन सख्ख्या बहिणींचे आढळले कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 18:42 IST

Suicide in Nagpur : या दोन्ही महिलांचे कुजलेले मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले आहेत. 

ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाल ओळी नंबर २ येथील लवटे यांच्या घरी कामठी नगर परिषदेचा कर्मचारी घरकराची डिमांड पावती देण्याकरिता गेला असता घर बंद असल्याने त्याने शेजाऱ्यांना विचारणा केली.

नागपूर (कामठी) : नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील दाल ओळी नंबर २ येथील एका बंद घरात दोन सख्ख्या बहिणींचे कुजलेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कल्पना नागोराव लवटे (५०) आणि पद्मा लवटे (६०) अशी या मृत महिलांची नावे आहेत. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. प्रकरणाची माहिती मिळताच जुनी कामठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दोन्ही महिलांच्या मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या दोन्ही महिलांचे कुजलेले मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाल ओळी नंबर २ येथील लवटे यांच्या घरी कामठी नगर परिषदेचा कर्मचारी घरकराची डिमांड पावती देण्याकरिता गेला असता घर बंद असल्याने त्याने शेजाऱ्यांना विचारणा केली. शेजाऱ्यांनी दाराच्या आतून पावती खाली टाकण्यास सांगितले. संबंधित कर्मचारी पावती टाकण्यासाठी घराच्या आवारात शिरला गेला असता त्याला आतून दुर्गंधीचा वास आला. याबाबत त्याने शेजाऱ्यांना सांगितले. या घटनेची माहिती लगेच जुनी कामठी पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. ठाणेदार विजय मालचे सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. त्याने लवटे यांच्या घराचे दार उघडले असता पलंगावर कल्पना लवटे व पलंगाच्या खाली जमिनीवर पद्मा लवटे या दोघीही मृतावस्थेत दिसून आल्या. पोलिसांचे पथक घटनास्थळाची तपासणी करीत आहे. यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे कामठी पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूरPoliceपोलिस