कामशेत येथे अज्ञात वाहनांच्या धडकेने महिलेचा मृत्यु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 12:30 IST2018-12-21T12:29:48+5:302018-12-21T12:30:21+5:30

शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात एका अज्ञात वाहनांची धडक बसुन महिलेचा मृत्यु झाला.

The death of a women with unknown vehicle in Kamshet | कामशेत येथे अज्ञात वाहनांच्या धडकेने महिलेचा मृत्यु 

कामशेत येथे अज्ञात वाहनांच्या धडकेने महिलेचा मृत्यु 

कामशेत : शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात एका अज्ञात वाहनांची धडक बसुन गिरीजाबाई महादेव वाघमारे ( वय ६५ रा. मराठी शाळेच्या मागे कान्हे ) यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी कैसर शेख यांनी पोलिसांना खबर दिली. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार ( दि. १९) रोजी संध्याकाळी ६:४५ च्या सुमारास एका अज्ञात वाहनांची धडक बसुन गिरीजाबाई महादेव वाघमारे यांना धडक बसली. त्यांना उपचारासाठी कामशेत येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.याप्रकरणी अधिक तपास कामशेत पोलीस करत आहे.कामशेत शहरातील एका गजबजलेल्या चौकात धडक बसल्यानंतर एका महिलेचा मृत्यू होतो. परंतु, कोणत्या वाहनाने हा अपघात झाला आहे ते समजत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याप्रकरणी कोणीच पोलिसांना माहिती देत नसल्याने गाडी चालकाला वाचवण्याचा प्रयत्न कोण करत आहे का असा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होताना दिसत आहे. 

Web Title: The death of a women with unknown vehicle in Kamshet