टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 22:08 IST2019-05-20T22:06:55+5:302019-05-20T22:08:27+5:30
अपघात स्थळावरून टँकर चालकाने वाहन सोडून पळ काढला असून वालीव पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंद केला आहे.

टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू
ठळक मुद्देअचानक उजव्या बाजूला येऊन बुलेटच्या मधोमध जोरदार धडक दिली. सेनकुमार यांच्या डोक्याला, छातीला, पाठीला आणि हाता पायाला मुका मार लागल्याने मृत्यू झाला आहे.
नालासोपारा - मुंबईच्या अंधेरी येथील मोगरावाडा येथे राहणाऱ्या सेनकुमार छोटुराम सुतार (42) यांच्या बुलेट (क्रमांक एम एच 02 ई जे 7593) मोटार सायकल येत असताना शनिवारी सकाळी वसई पूर्वेकडील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बाफाना ब्रिजच्या अगोदर भरधाव वेगातील पाण्याच्या टँकरने (क्रमांक एम एच 04 सी जी 815) अचानक उजव्या बाजूला येऊन बुलेटच्या मधोमध जोरदार धडक दिली. यात सेनकुमार यांच्या डोक्याला, छातीला, पाठीला आणि हाता पायाला मुका मार लागल्याने मृत्यू झाला आहे. अपघात स्थळावरून टँकर चालकाने वाहन सोडून पळ काढला असून वालीव पोलिसांनीअपघाती मृत्यूचा गुन्हा नोंद केला आहे.