खेळता खेळता सातव्या मजल्यावरून खाली पडून चिमुकलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 21:59 IST2018-11-19T21:57:24+5:302018-11-19T21:59:12+5:30

शनिवारी घरात प्रियल खेळत होती. खेळता खेळता ती बाल्कनीत गेली. बाल्कनीला पुर्ण संरक्षक जाळी नव्हती. त्यामुळे प्रियल तोल जाऊन खाली पडली.

The death of a small animal falls down from the seventh floor | खेळता खेळता सातव्या मजल्यावरून खाली पडून चिमुकलीचा मृत्यू

खेळता खेळता सातव्या मजल्यावरून खाली पडून चिमुकलीचा मृत्यू

ठळक मुद्दे १८ महिन्याच्या मुलीचा सातव्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू शनिवारी घरात प्रियल खेळत होती. खेळता खेळता ती बाल्कनीत गेली. बाल्कनीला पुर्ण संरक्षक जाळी नव्हती. त्यामुळे प्रियल तोल जाऊन खाली पडली. या इमारतीच्या बाल्कनीला पूर्ण संरक्षक जाळी नाही.

नालासोपारा - नालासोपारा येथे एका १८ महिन्याच्या मुलीचा सातव्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बाल्कनीला संरक्षक जाळी नसल्याने खेळताना ही चिमुकली खाली पडली. 

नालासोपारा पूर्व येथील यशवंत गॅलक्सी कॉम्प्लेक्सच्या संदीप हाईट्स ही आठ मजली इमारत आहे. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर शिवम दास हे पत्नी, १८ महिन्यांची मुलगी प्रियल आणि सासूसह राहतात. शनिवारी घरात प्रियल खेळत होती. खेळता खेळता ती बाल्कनीत गेली. बाल्कनीला पुर्ण संरक्षक जाळी नव्हती. त्यामुळे प्रियल तोल जाऊन खाली पडली. तिला तुळींज येथील पालिका रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या इमारतीच्या बाल्कनीला पूर्ण संरक्षक जाळी नाही. दुर्घटना घडली तेव्हा तिची आई आणि आजी घरात होते. दास कुटुंबिय एक वर्षापुर्वीच या इमारतीत राहण्यासाठी आले होते तुळींज पोलिसांनी याप्रकऱणी अपमृ्त्यूची नोंद केली आहे.

Web Title: The death of a small animal falls down from the seventh floor