जागीच झाला मृत्यू, दुचाकीवरुन पती-पत्नी परताना अज्ञात वाहनाची जोरदार धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 20:16 IST2022-06-10T20:08:19+5:302022-06-10T20:16:07+5:30
Accident Case : शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान दहातोंडा फाट्या नजीक झालेल्या ट्रक - दुचाकी अपघातात पती - पत्नी दोघेही घटनास्थळीच ठार झाले.

जागीच झाला मृत्यू, दुचाकीवरुन पती-पत्नी परताना अज्ञात वाहनाची जोरदार धडक
मूर्तिजापूर : कारंजा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावर अपघात हे नित्याचेच झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान दहातोंडा फाट्या नजीक झालेल्या ट्रक - दुचाकी अपघातात पती - पत्नी दोघेही घटनास्थळीच ठार झाले.
मूर्तिजापूर तालुक्यातील हिवरा कोरडे येथून आपल्या गावी मेहा ता. कारंजा येथे एमएच ३७ एस ५७३४ क्रमांकाच्या दुचाकीवरुन पती - पत्नी परत जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने विनोद वासुदेव वानखडे (५०), सविता विनोद वानखडे (४७) राहणार मेहा तालुका कारंजा हे दोघे पती-पत्नी घटनास्थळी ठार झाले. घटनेची माहिती कळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोनीही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
स्वत: पोलीस बनला अन् मित्राला TC बनवलं; प्रवाशांना लुटायला गेले अन् जाळ्यात सापडला
मृत्यू मार्ग ठरलेल्या कारंजा महामार्गावर अपघाचे प्रमाण वाढले आहेत अत्यंत खड्डेमय झालेल्या रस्त्यावर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या संदर्भात संबंधित विभागाला अनेक संघटनांनी निवेदने देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे परंतु अद्याप पर्यंत हे सुरुस्तीचे काम प्रलंबित असल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे.