प्रेमाची शिक्षा मृत्यू! पत्नीच्या हट्टापायी सासरी आलेल्या जावयाची साऱ्याने केली निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:07 IST2026-03-18T14:06:40+5:302026-03-18T14:07:06+5:30

आपल्या मुलीने केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून एका वकिली करणाऱ्या सासऱ्याने स्वतःच्या जावयाची खाटेच्या पायानं मारहाण करून हत्या केली.

Death is the punishment for love! Sarai brutally kills son-in-law who came to her in-laws at the insistence of his wife | प्रेमाची शिक्षा मृत्यू! पत्नीच्या हट्टापायी सासरी आलेल्या जावयाची साऱ्याने केली निर्घृण हत्या

प्रेमाची शिक्षा मृत्यू! पत्नीच्या हट्टापायी सासरी आलेल्या जावयाची साऱ्याने केली निर्घृण हत्या

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमधील आशियाना परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. आपल्या मुलीने केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून एका वकिली करणाऱ्या सासऱ्याने स्वतःच्या जावयाची खाटेच्या पायानं मारहाण करून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी मुख्य आरोपी वकिलासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

४ वर्षांपूर्वी झालं होतं लव्ह मॅरेज

प्रतापगडमधील सांगीपूर येथील रहिवासी असलेल्या विष्णू यादव (३२) याने चार वर्षांपूर्वी आशियाना येथील वकील तीरथ राज सिंह यांची मुलगी साक्षी हिच्याशी प्रेमविवाह केला होता. या लग्नामुळे तीरथ राज सिंह प्रचंड संतापलेले होते. विष्णू आपल्या पत्नीसह आणि तीन वर्षांच्या मुलीसह प्रतापगडमध्ये राहत होता. मात्र, सासरी नातेसंबंध सुधारतील या आशेने आणि पत्नी साक्षीच्या हट्टापायी विष्णू मंगळवारी लखनऊला आपल्या सासरी आला होता. पण सासरच्या घरी त्याची ही शेवटची भेट ठरेल, याची त्याला कल्पनाही नव्हती.

खाटेच्या पायाने केले डोक्यावर वार

मंगळवारी रात्री १०:३० च्या सुमारास घरच्या व्हरांड्यात विष्णू आणि त्याचे सासरे तीरथ राज सिंह यांच्यात कोणत्यातरी कारणावरून जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात असलेल्या तीरथ राज सिंह यांनी तिथेच पडलेला खाटेचा लाकडी पाय उचलला आणि विष्णूच्या डोक्यावर सपासप वार केले. हे वार इतके भीषण होते की, विष्णूचा जागीच मृत्यू झाला. वडिलांच्या तावडीतून पतीला वाचवण्यासाठी गेलेली साक्षीदेखील या हल्ल्यात जखमी झाली आहे.

पोलिसांकडून ५ जण ताब्यात

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विक्रांत वीर आणि एसीपी अभय प्रताप मल्ल यांच्यासह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला विष्णूचा मृतदेह पाहून पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी वकील तीरथ राज सिंह आणि त्यांच्या चार मुलींना ताब्यात घेतले आहे. हत्येसाठी वापरलेला खाटेचा पाय पोलिसांनी जप्त केला असून, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे गोळा केले आहेत.

Web Title : प्रेम विवाह बना जानलेवा: लखनऊ में ससुर ने दामाद की हत्या की।

Web Summary : लखनऊ में एक वकील ने अपनी बेटी से शादी करने पर अपने दामाद की हत्या कर दी। ससुर ने खाट के पाये से हमला किया। पुलिस ने वकील समेत पांच लोगों को गिरफ्तार किया। दंपति ने चार साल पहले शादी की थी।

Web Title : Love marriage turns deadly: Father-in-law murders son-in-law in Lucknow.

Web Summary : In Lucknow, a lawyer killed his son-in-law for marrying his daughter. The father-in-law attacked him with a bed leg. Police arrested five people, including the lawyer. The couple had married four years prior.