कोरेगाव भीमा : पुणे - नगर रस्त्यावरील कोेरेगाव भीमा येथे सोमवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास भीमानदी पुलाच्या वळणाच्या ठिकाणी चारचाकी वाहनाच्या धडकेने दोन पादचारी तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मोटार कारचा अक्षरश: चुराडा झाला. पुण्याकडून शिरूरकडे जाणाऱ्या पुलावरून कोरेगावच्या परिसरात चारचाकी वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पायी जात असलेल्या दोन जणांना वाहनाची जोरदार धडक बसली. यामुळे चारचाकी वाहन महामार्गावरील संरक्षण कठडे तोडून रस्त्याखाली कोसळली.
कोरेगाव भीमा येथे चारचाकी वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 12:35 IST