आगीत होरपळून ग्रॅंट रोड येथे ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 20:39 IST2018-11-07T20:39:14+5:302018-11-07T20:39:32+5:30

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे ती लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

The death of 65-year-old woman at Grant Road after being burnt to death | आगीत होरपळून ग्रॅंट रोड येथे ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू

आगीत होरपळून ग्रॅंट रोड येथे ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू

मुंबई -  ग्रॅंट रोड येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीत 65 वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. ऑगस्ट क्रांती मार्गावरील निर्मल निवास येथे ही घटना घडली. नर्गीस कांगा असे मृत महिलेचे नाव आहे.
घरातून धूर येत असताना पाहिल्यानंतर शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यावेळी गंभीर स्वरूपात भाडलेल्या नर्गिस यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किटमुळे ती लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: The death of 65-year-old woman at Grant Road after being burnt to death