Dawood Connection of Sushant Singh Rajput Suicide ?, Video goes viral on social media | Video : सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचे दाऊद कनेक्शन?, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल 

Video : सुशांत सिंग राजपूत आत्महत्येचे दाऊद कनेक्शन?, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल 

ठळक मुद्दे पण सोशल मीडियावर एका माणसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली नाही, त्याची हत्या केली गेली आहे आणि त्यात दाऊद इब्राहिमचा हात आहे, हे सांगण्यात येत आहे.व्हिडिओमधील व्यक्तीचे नाव एनके सूद असे आहे. ते स्वत: ला भारतीय गुप्तहेर संस्था रॉचा माजी कर्मचारी असल्याचे सांगत आहे. प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली. तो नैराश्यात असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पोस्टमार्टम अहवालात असे म्हटले आहे की, त्याचा मृत्यू लटकल्यामुळे श्वास गुदमरून झाला. त्याच्या व्हिसेरा अहवालात असेही म्हटले आहे की, त्याच्या शरीरात कोणतेही संशयास्पद रसायने किंवा विष आढळले नाहीत. आता पोलीस त्याच्या व्यावसायिक कोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात ३० पेक्षा अधिक जणांची मुंबई पोलिसांनीही चौकशी केली असून अद्याप तपास सुरू आहे.


पण सोशल मीडियावर एका माणसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली नाही, त्याची हत्या केली गेली आहे आणि त्यात दाऊद इब्राहिमचा हात आहे, हे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात की, दाऊद गॅंगमधील व्यक्तीने सुशांत सिंग राजपूत यांना फोनवरून धमकी दिली होती, ज्यामुळे तो तणावात होता. या गॅंगमधील लोकच नव्हे तर सुशांतच्या जवळचे काही लोकही यात सामील असल्याचे त्याने म्हटले आहे.


व्हिडिओमधील व्यक्तीचे नाव एनके सूद असे आहे. ते स्वत: ला भारतीय गुप्तहेर संस्था रॉचा माजी कर्मचारी असल्याचे सांगत आहे. त्यांचा असा दावा आहे की, सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी १३ जून रोजी त्यांच्या घराचा सीसीटीली कॅमेरा बंद करण्यात आला होता. याशिवाय ते म्हणाले की,केवळ दाऊद गॅंगच्या धमक्या टाळण्यासाठी सुशांत सिंगने ५० वेळा सिमकार्ड बदलला आणि घरात झोपण्याऐवजी तो बऱ्याचदा गाडीत झोपायचा.


एनके सूद यांनी सुशांत सिंगचा नोकर, त्याचा मित्र संदीप सिंग आणि बॉलिवूडमधील अनेक दिग्गज व्यक्तींकडेही संशयाची सुई वळवली आहे. संदीप सिंह चित्रपट निर्मिती करतो आणि सुशांत सिंगचा खूप जवळचा आणि चांगला मित्र होता. ते अंकिता लोखंडे यांचेही खूप चांगले मित्र आहेत.

ऐका एनके सूद काय सांगतात  

Web Title: Dawood Connection of Sushant Singh Rajput Suicide ?, Video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.