खोलीत हिडन कॅमेरा लावून सुनेने सासू-सासऱ्यांचे व्हिडीओ बनवले, पतीला धमकावले, त्यानंतर बॉयफ्रेंडसोबत झाली पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 12:45 IST2022-09-19T12:45:24+5:302022-09-19T12:45:33+5:30

Crime News: एका बदमाश सुनेने बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावून सासू-सासऱ्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केले. सदर महिला घरातील दोन कोटींचे दागिने आणि दीड लाखांची रोख रक्कम घेऊन पसार झाली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Daughter-in-law filmed mother-in-law with hidden camera in room, threatened husband, then had sex with boyfriend | खोलीत हिडन कॅमेरा लावून सुनेने सासू-सासऱ्यांचे व्हिडीओ बनवले, पतीला धमकावले, त्यानंतर बॉयफ्रेंडसोबत झाली पसार

खोलीत हिडन कॅमेरा लावून सुनेने सासू-सासऱ्यांचे व्हिडीओ बनवले, पतीला धमकावले, त्यानंतर बॉयफ्रेंडसोबत झाली पसार

नवी दिल्ली - एका बदमाश सुनेने बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावून सासू-सासऱ्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केले. सदर महिला घरातील दोन कोटींचे दागिने आणि दीड लाखांची रोख रक्कम घेऊन पसार झाली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या सुनेचे गेल्या ४ वर्षांपासून तिच्या कॉलेजमधील मित्रासोबत प्रेमसंबंध होते, असा आरोपही करण्यात येत आहे. या महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांत करण्यात आलेल्या तक्रारीनुसार सदर सुनेने प्रियकरासोबत मिळून सासू-सासऱ्यांच्या खोलीत छुपे कॅमेरे लावले होते. त्यानंतर त्याचे व्हिडीओ तयार केले. जेव्हा व्हिडीओची बाब समोर आली. तेव्हा सदर आरोपी महिला घरातील कोट्यवधीची ज्वेलरी आणि रोख रक्कम घेऊन फरार झाली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित कुटुंब हे लक्ष्मीनगर परिसरात राहते. त्यांचा चांदनी चौक परिसरात सोने आणि हिऱ्यांचा ज्वेलरीचा व्यवसाय आहे. या कुटुंबात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक भाऊ आहे. पीडित आणि त्याच्या भावाचा विवाह झाला आहे. तसेच हा भाऊ त्याच्या कुटुंबासह दुसऱ्या घरात राहत होता. तर पीडित तरुण आई-वडिलांसह जिथे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आले त्या घरात राहतो. 

तक्रारदार पतीचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र त्यांच्या संसारात कुरबुरी सुरू होत्या. दरम्यान, त्याने त्याच्या पत्नीच्या मोबाईलमध्ये पत्नीच्या मोबाईलमध्ये मित्राचे अश्लील मेसेज पाहिले. त्यानंतर त्याने आखणी काही मेसेज वाचले. त्यामुळे मित्रासोबत पत्नीच्या असलेल्या प्रेमप्रकरणाबाबत त्याला माहिती मिळाली. 

त्यानंतर सदर तरुणाने पत्नीच्या मित्राला फोनवर बोलून बोलावलं. त्यानंतर त्याने पत्नीशीही याबाबत बोलणी केली. मग पत्नी घरातील दागिने आणि रोकड घेऊन पसार झाली. तसेच जर तू हे प्रकरण संपवलं नाही, तर सोशल मीडियावर तुझ्या आई वडिलांचे बेडरुममधीस व्हिडीओ शेअर करेन अशी धमकी तिने पतीला दिली. 

Web Title: Daughter-in-law filmed mother-in-law with hidden camera in room, threatened husband, then had sex with boyfriend